Sainik School Admission Process : प्रत्येक पालकाला वाटतं आपल्या मुलांनी देशातील सर्वात चांगल्या शाळेत शिक्षण घ्यावं. पण सर्वांचीच आर्थिक परिस्थिती भक्कम नसते. त्यामुळे लाखो रुपयांचे शुल्क भरण्यात काही पालकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. जगातील सर्वात चांगल्या सुविधा ज्या शाळेत असतील, तिथे मुलांनी शिक्षण घ्यावं अशी त्यांची इच्छा असते. पण आर्थिक चणचण असल्यामुळे अशा शाळेत अ‍ॅडमिशन घेणे शक्य होत नाही. पण अशा लोकांसाठी सैनिक शाळेचा एक चांगला विकल्प आहे. भारताच्या सैनिक शाळेत याप्रकारच्या सुविधा असलेलं शिक्षण, अनुशासन आणि ट्रेनिंग दिलं जातं. या शाळेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य उज्वल होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सैनिक शाळेत अ‍ॅडमिशन कसं मिळतं?

सैनिक शाळेत अ‍ॅडमिशन इयत्ता सहावी आणि नववी मध्ये होतो. जर तुम्हाला तुमच्या मुलाचं अ‍ॅडमिशन सैनिक शाळेत करायचं असेल, तर तुम्ही तो सहावीत किंवा नववीत असेल, त्यावेळी त्याचं अॅडमिशन करावं. सहावी इयत्तेत अॅडमिशन घेण्यासाठी मुलांचं वय १० ते १२ वर्षांच्या दरम्यान असलं पाहिजे. तर इयत्त नववीच्या अ‍ॅडमिशनसाठी मुलाचं वय १३ ते १५ दरम्यान असलं पाहिजे. या शाळेत अ‍ॅडमिशन घेण्यासाठी प्रत्येक वर्षी एक फॉर्म दिला जातो. हा फॉर्म भरण्यासाठी मुलांना पूर्व परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच सैनिक शाळेत अ‍ॅडमिशन मिळू शकतं.

नक्की वाचा – चेन खेचल्यावर ट्रेन का थांबते? पोलिसांना चेन खेचणाऱ्या प्रवाशाबद्दल कसं कळतं? हे आहे त्यामागचं कारण

सैनिक शाळेचा फॉर्म कधी निघतो?

देशातील सैनिक शाळेंचे फॉर्म यंदा २०२३ वर्षासाठी ७ डिसेंबर ते ११ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन भरु शकता. तुम्हाला तुमच्या मुलाच या सैनिक शाळेत अ‍ॅडमिशन करायचं असेल, तर या तारखेमध्येच ऑनलाईनच्या माध्यमातून अॅडमिशन फॉर्म भरुन घ्या. सर्वात महत्वाचं म्हणजे, फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा. कोणतीही चूक होणार नाही, याची दक्षता घ्या.

कशी होते पूर्व परीक्षा?

सैनिक शाळेत अ‍ॅडमिशन घेण्यासाठी सर्वात पहिले पूर्व परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागतं. नॅशनल टेस्टिंग एजेंन्सीकडून या परीक्षेच आयोजन करण्यात येतं. ही परीक्षा दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित केली जाते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the details of sainik school admission form and fees how is the entrance exam of sainik school nss