Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेमध्ये विविध पदांच्या नोकरीसाठी उमेदवारांकडून नोकरीचा अर्ज मागवण्यात येत आहे. नेमकी कोणती आणि किती पदे रिक्त आहेत, याबद्दल इच्छुक उमेदवारांनी माहिती पाहा. तसेच नोकरीचा अर्ज कुणी करावा, त्यासाठी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता, निवड पद्धती आणि अर्जाची अंतिम तारीख काय आहे याबद्दल जाणून घ्यावे.

Konkan Railway Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

कोकण रेल्वेमध्ये खालील पदांसाठी भरती करण्यात येणार आहे –

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Job Opportunity, Central Government Job, Job,
केंद्र सरकारच्या ‘या’ विभागांमध्ये नोकरीची संधी, २३ नोव्हेंबरपर्यंत…
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
Bank of baroda recruitment 2024 bank of baroda is conducting the recruitment for 592 Vacancies
BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; ५९२ जागांसाठी अर्ज करा अन् घ्या घसघशीत पगार
UPSC Preparation UPSC Mains Exam 2024 Overview of the question career
UPSC ची तयारी: UPSC मुख्य परीक्षा २०२४; प्रश्नाचे अवलोकन

EE/करार या पदासाठी एकूण तीन पदांवर भरती करण्यात येणार आहे.

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण तीन पदांवर भरती करण्यात येणार आहे.

ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण १५ पदांवर भरती करण्यात येणार आहे.

ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल या पदासाठी एकूण चार पदांवर भरती करण्यात येणार आहे.

डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण दोन पदांवर भरती करण्यात येणार आहे.

तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण १५ पदांवर भरती करण्यात येणार आहे.

अशा एकूण ४२ रिक्त जागांवर कोकण रेल्वेमध्ये भरती करण्यात येणार आहे.

हेही वाचा : BHC Bharti Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूरमध्ये होणार मोठी भरती! माहिती पाहा

Konkan Railway Recruitment 2024 : शैक्षाणिक पात्रता

EE/करार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी / डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी / डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनीयरिंगमधील पदवी / डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ITI (ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल))/इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही ट्रेडमधील मान्यताप्राप्त संस्थेतून ITI शिक्षण असावे.

तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी / डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

Konkan Railway Recruitment 2024 : वेतन

EE/करार या पदावर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना ५६,१००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदावर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना ४४,९००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदावर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना ३५,४००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल या पदावर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना ३५,४००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल या पदावर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना ३५,४००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदावर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना २५,५००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

Konkan Railway Recruitment 2024 – कोकण रेल्वे अधिकृत वेबसाईट लिंक –
https://konkanrailway.com/

Konkan Railway Recruitment 2024 – अधिसूचना –
https://konkanrailway.com/uploads/vacancy/1715260364Electrcial_dept_Notification-Contract_-Final.pdf

Konkan Railway Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील पदांसाठी नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नोकरीसाठी मुलाखत द्यायची आहे.
या मुलाखतीचा पत्ता खालीलप्रमाणे आहे –
मुलाखतीचा पत्ता – एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. जवळ, सीवूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई<br>वरील नोकरीच्या मुलाखती या ५ जून २०२४ ते २१ जून २०२४ दरम्यान घेण्यात येणार आहेत.
मुलाखतीसाठी जाताना उमेदवारांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

वरील नोकरीसंबंधी अधिक माहिती हवी असल्यास, उमेदवारांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. तसेच, कोणत्या पदाची मुलाखत कोणत्या तारखेस आहे, याबद्दल उमेदवारांनी नोकरीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केली आहे.