Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेत नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे, कारण भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे विभागात अनेक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानुसार, वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल), स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक पदासह काही इतर पदांच्या १९० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२४ आहे.पण अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी विषयी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवरुन जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिक्त पदे – १९०

पदाचे नाव आणि तपशील:

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरती प्रक्रियेअंतर्गत सिनियर सेक्शन इंजिनिअर पदासाठी ०५ जागा, सिनियर सेक्शन इंजिनिअर पदासाठी ०५ जागा, स्टेशन मास्टर पदासाठी १० जागा तसेच कमर्शियल सुपरवाइजर ०५ जागा, गुड्स ट्रेन मॅनेजर ५ जागा,टेक्निशियन III (Mechanical) २० जागा, टेक्निशियन III (Electrical) १५ जागा,ESTM-III (S&T) पदासाठी १५ जागा, असिस्टंट लोको पायलट पदासाठी १५ जागा, पॉइंट्स मन पदासाठी ६० जागा आणि ट्रॅक मेंटेनर-Iपदासाठी ३५ जागा, अशा मिळून एकूण१९० जागांववर भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरती प्रक्रियेती रिक्त पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. इयत्ता १० वी, १२ वीसह कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करु शकता. पण यासह काही पदांसाठी १२ वीत Physics & Maths विषयात उत्तीर्ण असण्यासह इंजिनिअरिंगमधील विविध विषयांमधील पदवी आवश्यक आहे. या पदवी विषयांमध्ये(Civil, Mechanical/ Electrical / Electronics, Automobile) ITI (Electrician / Electronics Mechanic / Wireman/ Armature and Coil Winder, / Fitter /Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman) समावेश आहे. किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile) आवश्यक आहे.

वयाची अट: उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२४ दरम्यान किमान १८ ते ३९ असणे आवश्यक आहे. पण एससी आणि एसटी उमेदवारांना वयात ०५ वर्षे तर ओबीसी उमेदवारांना ०३ वर्षे सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार हे ०६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. ही अर्जाची प्रक्रिया १६ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होईल.

Read More Career News : Palghar ZP Recruitment 2024 : पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदासाठी १५०० पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी भरती; असा करा अर्ज…

अर्ज शुल्क – ५९

नोकरीचे ठिकाण : कोकण रेल्वे

पगार

भरती प्रक्रियेत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना विविध पदांनुसार दरमहा ४४९०० हजार ते १८००० दरम्यान पगार दिला जाणार आहे.

अधिकृत जाहिरात आणि पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.

konkanrailway.com

अधिकृत वेबसाईट

konkanrailway.com

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkan railway recruitment 2024 konkan railway corporation limited krcl bharti for 190 posts how to apply konkanrailway com sjr