KTCL Goa Bharti 2024: KTCL गोवा (Kadamba Transport Corporation Limited Goa) “कंडक्टर” च्या रिक्त पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार आहे. पदे भरण्यासाठी एकूण ७० जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण गोवा आहे. पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या नमूद पत्त्यावर त्यांचे अर्ज जमा करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर २०२४ आहे. KTCL गोवा ची अधिकृत वेबसाइट ktclgoa.com आहे.

KTCL Goa Recruitment 2024 :शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरती मोहिमेंतर्गत कंडक्टर पदासाठी भरती आयोजित केली आहे. पात्र उमेदवाराकडे एसएससी किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता असावी. डायेरक्टर ऑफ ट्रान्सपोर्न गोवा तर्फे कंडक्टर लायसेन्स आणि बॅजेस दिले जातील.

Chandrapur District Bank recruitment case interviews due to fear of administrator appointment
प्रशासक नियुक्तीच्या भीतीपोटी युद्धपातळीवर मुलाखती, चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Bank Of Baroda Specialist Officer Recruitment 2025: Registration Window To Close Soon, Salary Up To Rs 1.35 Lakh
Bank Job: बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती; १.३५ लाखापर्यंत मिळणार पगार; कसा अर्ज कराल जाणून घ्या
Meta to lay off 3600 employees
Meta to Lay Off : मेटा ३६०० कर्मचार्‍यांना देणार नारळ! मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं कारण
ITBP Recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : ‘आयटीबीपी’त ५१ पदे रिक्त
principal posts , Reservation , MPSC,
अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर एमपीएससीने आरक्षण काढून टाकले, आता सर्व पदे खुल्या वर्गासाठी
Highway work , workers , Karad, Satara,
सातारा : कराडमध्ये महामार्गाचे काम कामगारांकडून बंद, वेतन थकले, वाहनधारक हवालदिल
ESIC Recruitment 2025
ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?

KTCL Goa Application 2024 : महत्त्वाचे दस्तऐवज (Important Documents )

१.जन्म प्रमाणपत्र.
२. शैक्षणिक पात्रता.
३. वैध रोजगार नोंदणी कार्ड.
४. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले गोव्यातील वैध 15 वर्षांचे वास्तव्य प्रमाणपत्र.
५. सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेला बॅज असलेला वैध कंडक्टर परवाना.
६. रोजगार राहण्यासाठी किंवा कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारच्या कोणत्याही योजनेअंतर्गत उमेदवाराने त्याने/तिने कुठलेही आर्थिक सहाय्य घेतलेले नाही .
७) कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लि.मध्ये कंडक्टरच्या नियमित पदावर तो/ती कोणत्याही धारणाधिकाराचा( पैसे देणाऱ्या व्यक्तीच्या मालमत्तेवर दावा) दावा करणार नाही याची उमेदवाराने हमी
८)अर्जावर एक पासपोर्ट आकाराचा फोटो लावावा.

KTCL Goa Jobs 2024 : वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय ४५ वर्षे असावे.

KTCL गोवा ऍप्लिकेशन २०२४ वेतन तपशील

कंडक्टर – रु.७३३/- प्रतिदिन

अधिसुचना – https://ktclgoa.com/wp-content/uploads/2024/11/ADVERTISEMENT_2024_ON_WEBSITE.pdf

KTCL Goa Jobs 2024 अधिसुचना

KTCL Goa Jobs 2024 : कसा करावा अर्ज (How To Apply )
या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्जाचे विहित नमुने ktclgoa.com वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत.
कोणतेही कारण न देता विहित नमुन्यातील आणि आवश्यक निकषांनुसार न आढळल्यास अर्ज सरसकट नाकारला जाईल.

Story img Loader