JEE Main 2024 : एनटीए (NTA) अर्थात राष्ट्रीय परीक्षा एजेन्सीकडून जेईई म्हणजेच संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मेन २०२४ च्या पहिल्या सत्रासाठीची अर्ज प्रक्रिया आज बंद केली जाणार आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार केवळ आजच अर्ज करु शकतात. तसेच इच्छुक उमेदवार jeemain.nta.ac.in.या बेवसाईटवरुन आपले अर्ज करु शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय परीक्षा एजेन्सीकडून आयआयटी, नीट तसेच इतर केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्था तसेच विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात जेईई ही परीक्षा घेतली जाते. जेईई मेन २०२४ साठी नॅशनल टेस्टिंग एजेन्सीने नोंदणी सुरू केली होती, ती आज ३० नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठीची आवश्यक लिंक या लेखात दिली आहे. या लिंकद्वारे तुम्ही थेट अर्ज करु शकता. तसेच अर्जासाठी घेतले जाणारे अर्ज शुल्क याची माहितीदेखील जाणून घ्या.

हेही वाचा- Bank Recruitment 2023: ‘IDBI’ बँकेत २१०० पदांसाठी होणार मेगाभरती! जाणून घ्या वयोमर्यादा, पात्रता आणि पगार

भारतीय उमेदवारांसाठी अर्ज शुल्क पुढील प्रमाणे –

अर्ज करण्यासाठीची थेट लिंक –

https://jeemain.nta.ac.in/

एक पेपर –

सामान्य पुरुष – १००० रुपये.

सर्वसाधारण महिला – ८०० रुपये.

Gen-EWS/ OBC (NCL) पुरुष – ९०० रुपये.

Gen-EWS/ OBC (NCL) महिला – ८०० रुपये.

SC/ST/PwD पुरुष आणि महिला, तृतीयपंथी – ५०० रुपये.

दोन पेपर (BE/BTech किंवा BAarch/BPlanning)

जनरल/Gen-EWS/OBC (NCL) पुरुष – २००० रुपये.

सामान्य/जनरल-EWS/OBC (NCL) महिला – १ हजार ६०० रुपये.

SC/ST/PwD पुरुष आणि महिला, तृतीयपंथी – १००० रुपये.

जेईई मेन २०२४ सत्र १ २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. प्रवेशपत्र प्रत्येक परीक्षेच्या दिवसाच्या तीन दिवस आधी जारी केली जाणार आहेत. तर परीक्षेचे ठिकाणाची माहिती देणारे पत्रक जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात जारी करण्यात येणार आहे. जेईई मेन २०२४ परीक्षेशी संबंधित अधिकची माहिती, पेपर पॅटर्न, वेळ, पात्रता आणि निकष याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जेईई मेन २०२४ सूचना बुलेटिन अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last date to apply for jee main 2024 today where and how to apply know the detailed information jap