LIC HFL Vacancy 2024: : जीवन विमा महामंडळ (LIC)मध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. कारण- एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) ने विविध राज्यांसाठी कनिष्ठ सहायक या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते LIC HFL च्या अधिकृत वेबसाइट lichousing.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया २५ जुलै पासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२४ आहे.या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण २०० पदे भरली जाणार आहेत.
रिक्त जागा (LIC HFL Recruitment Junior Assistant Vacancy 2024)
ज्युनियर असिस्टंट – २००
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे असावे. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील.
More Stories On Career : IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ४६७ रिक्त पदांवर होणार भरती; पगार १ लाखपेक्षा जास्त, जाणून घ्या सविस्तर
पगार
या पदांसाठी निवडलेल्या कोणत्याही उमेदवाराला दर महिन्याचा पगार जवळपास ३२,००० ते ३५,२०० च्या श्रेणीत दिला जाईल. निव्वळ पगारामध्ये मूळ वेतन, एचआरए, इतर फायदे आणि पीएफ – कंपनीचे योगदान समाविष्ट आहे.
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर (एकूण किमान ६०% गुण) असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांना कॉम्प्युटर सिस्टीममधील ऑपरेटिंग आणि कामकाजाचे ज्ञान अनिवार्य आहे.
अर्ज शुल्क
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ९४४ रुपये भरावे लागणार आहेत.
नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत
परीक्षा
सप्टेंबर २०२४
निवड प्रक्रिया
LIC HFL भर्ती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवारांची निवड ही अंतिम गुणवत्ता यादी आणि ऑनलाइन परीक्षा, तसेच मुलाखत यांच्या एकत्रित गुणांच्या आधारे केली जाईल.
अधिकृत वेबसाईट (LIC HCF Junior Assistant 2024)
www.lichousing.com
जाहिरातीसाठीचे संकेतस्थळ :
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा. तसेच परिपत्रक पूर्ण वाचून घ्यावेत.
www.lichousing.com/static-assets/pdf