सुहास पाटील

एलआयसी हाऊसिंग फिनान्स लिमिटेड (एलआयसी HFL) आपल्या देशभरातील ९ रिजन्समधील कार्यालयांत ज्युनियर असिस्टंट एकूण २०० पदांची भरती. (जाहिरात दि. २५ जुलै २०२४) राज्यनिहाय रिक्त पदांची विभागणी केलेली आहे. एलआयसी HFL मध्ये महाराष्ट्र राज्यातील ज्युनियर असिस्टंट्सची एकूण ५३ पदे रिक्त आहेत.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
Office Space, Pune, Mumbai, Delhi,
कार्यालयीन जागा सहकार्यात पुण्याचा झेंडा! मुंबई, दिल्लीला मागे टाकत देशात दुसऱ्या स्थानी झेप
Rajan Vikhare, demands CCTV system
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची मागणी
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
gadchiroli vidhan sabha election 2024
गडचिरोली, आरमोरीत थेट; अहेरीत तिरंगी लढत

(१) ज्युनियर असिस्टंट : एकूण रिक्त पदे ५३. (महाराष्ट्र राज्यातील)

पात्रता : (दि. १ जुलै २०२४ रोजी) पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण (दूरस्थ/ पत्रव्यवहार/ अर्धवेळ पद्धतीने घेतलेली पदवी पात्र नाही.) आणि संगणक चालविण्याचे सर्टिफिकेट किंवा शिक्षण घेत असताना संबंधित विषय अभ्यासलेला असावा.

वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२४ रोजी २१ ते २८ वर्षे.

प्रोबेशन कालावधी : सहा महिन्यांचा असेल, जो आणखीन ६ महिन्यांनी वाढविला जाऊ शकतो.

वेतन : दरमहा रु. ३५,२०/- अधिक इतर सुविधा. (मेडीक्लेम, ग्रॅच्युईटी, ग्रुप इन्श्युरन्स स्कीम, हाऊसिंग लोन, परफॉरमन्स लिंक्ड इन्सेन्टिव्ह इ.)

निवड पद्धती : ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यू.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : लष्करातील संधी

ऑनलाईन एक्झाम ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ २०० प्रश्न, २०० गुण, वेळ १२० मिनिटे. (परीक्षेचे माध्यम इंग्रजी)

(१) इंग्लिश लँग्वेज, (२) लॉजिकल रिझनिंग, (३) जनरल अवेअरनेस (हाऊसिंग फिनान्स इंडस्ट्रीविषयी अधिक भर), (४) न्यूमरिकल अॅबिलिटी, (५) कॉम्प्युटर स्किल प्रत्येकी ४० प्रश्न, ४० गुण, वेळ १२० मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.

इंटरव्ह्यू : इंटरव्ह्यूच्या वेळी कागदपत्र पडताळणी केली जाईल. इंटरव्ह्यूमध्ये किमान पात्रतेचे गुण मिळविणे आवश्यक. अंतिम निवड यादी ऑनलाईन परीक्षा आणि इंटरव्ह्यूमधील कामगिरीवर आधारित बनविली जाईल.

मेडिकल एक्झामिनेशन : निवडलेल्या उमेदवारांना मेडिकल एक्झाम द्यावी लागेल.

अर्जाचे शुल्क दोन्ही पदांसाठी रु. ८००/- + १८ टक्के जीएसटी.

ऑनलाईन अर्ज www.lichousing.com या वेबसाईटवर ‘ Careers’ heading मधून दि. १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत करावेत. (Application registration & gt; payment of fees)

अर्जासोबत स्कॅन केलेला फोटोग्राफ, स्वाक्षरी (काळ्या शाईने), डाव्या हाताचा निशाणी अंगठा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगामधील) स्वहस्ते लिहिलेले घोषणापत्र (declaration) अपलोड करणे आवश्यक आहे.

परीक्षा केंद्र : मुंबई/ नवी मुंबई/ ग्रेटर मुंबई/ ठाणे/ टटफ/ नागपूर/ पुणे/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती/ कोल्हापूर/ जळगाव इ. ऑनलाइन एक्झामसाठी कॉल लेटर www.lichousing.com या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.