राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड (RCF) (भारत सरकारचा उपक्रम). आपल्या थळ, रायगड व ट्रॉम्बे, मुंबईमधील ऑपरेटिंग युनिटमध्ये अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत एकूण ३७८ ग्रॅज्युएट/टेक्निशियन/ट्रेड अॅप्रेंटिसेस ट्रेनी पदांची भरती.

(ए) ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस पदे – एकूण १८२ पदे. अॅप्रेंटिसशिप कालावधी – १२ महिने. स्टायपेंड – दरमहा रु. ९,०००/-.

Kolkata Metro Railway to recruit for 128 Apprentice posts, registration begins on Dec 23 at mtp.indianrailways.gov.in
कोलकाता मेट्रोमध्ये भरती; नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Central Electronics Limited Recruitment 2024: Application Begins For Junior Technical Assistant And Technician Posts, Check Details
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरती, मिळणार ७५ हजारपर्यंत पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
SBI Clerk Recruitment 2024 Notification 2024 released for recruitment of Junior Associates at sbi.co.in
SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती; इच्छुक उमेदवारांनी लगेच करा अर्ज; अर्जाची लिंक बातमीत
BMC Recruitment 2024
BMC Bank Recruitment 2024: बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची संधी! ‘या’ पदांसाठी होणार भरती
PGCIL Recruitment through UGC NET December 2024 Apply for Officer Trainee posts at powergrid
PGCIL Recruitment 2024 : UGC NET द्वारे डिसेंबर २०२४मध्ये ऑफिसर ट्रेनीच्या पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया
job opportunity in indian institute of tropical meteorology
नोकरीची संधी: आयआयटीएम’मध्ये भरती
professor recruitment halted in maharashtra s non agricultural universities
अन्वयार्थ : निम्मेशिम्मे प्राध्यापक!

(१) अकाऊंट्स एक्झिक्युटिव्ह – ५१ पदे (ट्रॉम्बे युनिट – २६, थळ युनिट – २५).

पात्रता : B. Com., BBA/इकॉनॉमिक्स विषयासह पदवी. (इंग्लिश भाषेचे आणि कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान आवश्यक.)

(२) सेक्रेटरिअल असिस्टंट – ९६ पदे (ट्रॉम्बे युनिट – ६६, थळ युनिट – ३०).

पात्रता : (कोणतीही शाखा) पदवी उत्तीर्ण. (इंग्रजी भाषेचे आणि कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान आवश्यक) प्रशिक्षण कालावधी – १२ महिने.

(३) रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव्ह (एचआर) – ३५ पदे (ट्रॉम्बे युनिट – २०, थळ युनिट – १५).

पात्रता : पदवी (कोणतीही शाखा) (इंग्रजी भाषा आणि कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान आवश्यक).

(बी) टेक्निशियन अॅप्रेंटिसेस – एकूण ५४ पदे. प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष. स्टायपेंड – दरमहा रु. ८,०००/-.

(१) डिप्लोमा केमिकल – २० पदे (ट्रॉम्बे – १०, थळ – १०).

(२) डिप्लोमा कॉम्प्युटर – ६ पदे (ट्रॉम्बे – ३, थळ – ३).

(३) डिप्लोमा इलेक्ट्रिकल – १० पदे (ट्रॉम्बे – ५, थळ – ५).

(४) डिप्लोमा इन्स्ट्रूमेंटेशन – २० पदे (ट्रॉम्बे – १०, थळ – १०).

(५) डिप्लोमा मेकॅनिकल – २० पदे (ट्रॉम्बे – १०, थळ – १०).

(६) डिप्लोमा सिव्हील – १४ पदे (ट्रॉम्बे – ९, थळ – ५).

पात्रता : पद क्र. (बी) १ ते ६ साठी संबंधित विषयातील इंजिनिअरींग पदविका उत्तीर्ण.

(सी) ट्रेड अॅप्रेंटिसेस – एकूण ८० पदे. स्टायपेंड – दरमहा रु. ७,०००/-.

(१) अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट (AOCP) – ७४ पदे (ट्रॉम्बे – ३३, थळ – ४१). प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष.

(२) लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लांट) – ८ पदे. प्रशिक्षण कालावधी – १२ महिने.

पद क्र. १ व २ साठी पात्रता : (दि. १ एप्रिल २०२४ रोजी) B.Sc. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स (केमिस्ट्री मुख्य विषयांसह उत्तीर्ण).

(३) इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट) – ३ पदे (ट्रॉम्बे – २, थळ – १). प्रशिक्षण कालावधी – १२ महिने.

पात्रता : B. Sc. (PCM) (फिजिक्स मुख्य विषयासह उत्तीर्ण).

(४) बॉयलर अटेंडंट – ३ पदे (ट्रॉम्बे – २, थळ – १). कालावधी – २४ महिने.

(५) इलेक्ट्रिशियन – ४ पदे (ट्रॉम्बे – २, थळ – २). कालावधी – २४ महिने.

(६) मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (पॅथॉलॉजी) – २ पदे (ट्रॉम्बे – ०, थळ – २). कालावधी – १५ महिने.

पद क्र. ४ ते ६ साठी पात्रता : १२ वी (विज्ञान विषयासह) उत्तीर्ण.

(७) हॉर्टिकल्चर असिस्टंट – ६ पदे (ट्रॉम्बे – ३, थळ – ३).

पात्रता – १२ वी उत्तीर्ण. प्रशिक्षण कालावधी – २४ महिने.

पद क्र. २ व ४ साठी प्रशिक्षण कालावधी – २ वर्षं.

सर्व पदांसाठी पात्रता परीक्षा किमान सरासरी ५०ङ्घ गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अंतिम वर्षाच्या गुणांची टक्केवारी किंवा शेवटच्या दोन सेमिस्टर्सच्या गुणांची टक्केवारी) (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना किमान ४५ङ्घ गुण आवश्यक)

कॅटेगरी निहाय रिक्त पदांचा तपशिल – एकूण ३७८ पदे (अजा – ५६, अज – २८, इमाव – १०१, ईडब्ल्यूएस् – ३७, खुला – १५६)

सर्व पदांसाठी पात्रता परीक्षा दि. १ जानेवारी २०२२ किंवा त्यानंतर उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा : (दि. १ डिसेंबर २०२४ रोजी) सर्व पदांसाठी १८ ते २५ वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)

निवड पद्धती : पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांची गुणवत्ता यादी बनविली. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले जाईल. कागदपत्रांच्या पडताळणीतून योग्य ठरलेल्या उमेदवारांना अॅप्रेंटिस ट्रेनी पदावर नेमणूक दिली जाईल, त्यांना १ आठवड्याचा कालावधी जॉईन करण्यासाठी देण्यात येईल. दिलेल्या वेळेच्या पूर्वी निवडलेले उमेदवार जॉईन झाले नाहीत तर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. निवडलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी बनविली जाईल. CGPA/ CPI किंवा इतर ग्रेड्सचे परसेंटेजमध्ये रूपांतर करण्याचे संबंधित युनिव्हर्सिटी/इन्स्टिट्यूशनकडील सर्टिफिकेट रिपोर्टींगच्यावेळी सादर करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी – ट्रेड अॅप्रेंटिसेस पदांसाठी https:// apprenticeshipindia. gov. in; टेक्निशिअन अॅप्रेंटिसेस/ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस पदांसाठी www. nats. education. gov. in या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज www. rcfltd. com या संकेतस्थळावर दि. २४ डिसेंबर २०२४ (संध्या. ५.०० वाजे)पर्यंत करावेत.

अर्जासोबत (फोटोग्राफ व सही वगळता) इतर कोणतेही कागदपत्र अपलोड करावयाची नाहीत.

शंकासमाधानासाठी apprentice2024 @rcfltd. com या ई-मेलवर संपर्क साधा.

निवड झालेल्या उमेदवारांना सादर करावयाची मूळ कागदपत्र व त्यांच्या साक्षांकीत प्रती यांची यादी RCFL च्या वेबसाईटवरील जाहिरातीमधील पान क्र. ८ वरील IMPORTANT INSTRUCTIONS मध्ये दिलेली आहे.

Story img Loader