किरण सबनीस
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतामध्ये अलीकडेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या सहाय्याने शालेय शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यास सुरुवात झाली आहे. या धोरणाचा मुख्य भर सृजनशील अभिकल्प ( Creative Design) आणि नवकल्पनात्मक विचारसरणीवर ( Innovative Thinking) आहे. याचा परिणाम आपल्या विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजावर काय व कसा होईल हे या लेखात पाहणार आहोत.
नवीन शैक्षणिक धोरणात आता विचार करण्याची क्षमता ( Thinking Ability), समस्या सोडवण्याचे कौशल्य ( Problem Solving Ability) आणि सृजनशीलता ( Creative Exploration) यांना महत्त्व दिले जात आहे. कल्पना करा, नवीन शैक्षणिक धोरणामुळे नजीकच्या भविष्यात, विद्यार्थी केवळ पुस्तकांमधून शिकत नाहीत, तर नवनवीन तंत्रज्ञानासह प्रत्यक्ष निर्मितीही करतात. उदाहरणार्थ, ते IoT (Internet of Things) वापरून स्मार्ट सिटी मॉडेल्स डिझाइन करतात, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) वापरून कचरा वेचणारे व निरनिराळा करणारे रोबो बनवतात. अशा प्रकारे, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, २१ व्या शतकातील महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करतात.
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये डिझाइनचे महत्त्व…
नवीन शिक्षण धोरणामध्ये सृजनशील डिझाइन ( Creative Design) शिक्षणाला प्राथमिक (इयत्ता ६ ते ८) आणि माध्यमिक (इयत्ता ९ ते १२) या दोन्ही स्तरांवर महत्त्व दिले जाते. या दोन्ही स्तरांवर डिझाइन शिक्षणाचे स्वरूप कसे वेगळे असते हे पाहूया.
प्राथमिक स्तर (इयत्ता ६ ते ८) : डिझाइनच्या मूलभूत संकल्पना समजावून घेणे
या स्तरावर डिझाइन शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांना डिझाइनच्या मूलभूत संकल्पनांची ओळख करून देणे आणि त्यांच्यामध्ये सर्जनशीलता, समस्या सोडवणे आणि सहकार्य यासारखे गुण विकसित करणे हा आहे.
अभिकल्पनात्मक विचार ( Design Thinking): विद्यार्थ्यांना वापरकर्त्यांच्या समस्यांवर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी आणि नवीन कल्पनांचा विचार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. उदाहरणार्थ, विद्यार्थी शाळेतील कचरा कमी करण्यासाठी किंवा खेळाचे मैदान अधिक आकर्षक बनवण्यासाठी डिझाइन विचार करू शकतात.
मॉडेल बनवणे ( Model Making): विद्यार्थी त्यांच्या कल्पनांची रेखाचित्रे, प्रोटोटाइप आणि इतर मॉडेलिंग तंत्रांचा वापर करून मूर्त स्वरूपात आणतात. यामुळे त्यांना त्यांच्या कल्पनांचा चाचणी घेता येतो आणि त्यामध्ये सुधारणा करता येते. उदाहरणार्थ, विद्यार्थी एखाद्या नवीन खेळाच्या साधनाचे मॉडेल बनवू शकतात.
वापरकर्ता-केंद्रित डिझाइन ( User- Centric Design): विद्यार्थ्यांना इतरांच्या गरजा समजून घेण्यासाठी शिकवले जाते. यानंतर ते त्या गरजा पूर्ण करणारे डिझाइन तयार करतात. उदाहरणार्थ, विद्यार्थी वृद्धांसाठी वापरण्यास सोपा असा रिमोट कंट्रोल बनवू शकतात.
संवाद आणि सहकार्य : डिझाइन प्रकल्प अनेकदा गटात केले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना इतरांबरोबर प्रभावीपणे संवाद साधणे आणि सहकार्य करणे शिकण्यास मदत होते. त्यांना त्यांच्या कल्पना इतरांबरोबर सांगाव्या लागतात आणि इतरांच्या कल्पनांचा देखील विचार आणि आदर करावा लागतो.
माध्यमिक स्तर (इयत्ता ९ ते १२): डिझाइन प्रकल्प आणि विविध क्षेत्रांची ओळख
माध्यमिक स्तरावर डिझाइन शिक्षण अधिक आव्हानात्मक बनते. विद्यार्थ्यांना खालील गोष्टींचा अनुभव मिळतो –
अधिक सखोल डिझाइन प्रकल्प : विद्यार्थी वास्तविक जगातील समस्यांवर आधारित डिझाइन प्रकल्प पूर्ण करतात. हे प्रकल्प अधिक गुंतागुंतीचे असतात आणि त्यांच्यावर अधिक संशोधन आणि विश्लेषण करावे लागते. उदाहरणार्थ, विद्यार्थी शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी किंवा पाण्याची बचत करण्यासाठी डिझाइन तयार करू शकतात.
डिझाइन-आधारित उपाय ( Design- Based Solutions) : विद्यार्थी डिझाइन तंत्रज्ञानाचा वापर करून सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधतात. उदाहरणार्थ, विद्यार्थी ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी नवीन उपाय किंवा पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी एखादे घरगुती उपकरण बनवू शकतात.
विविध डिझाइन क्षेत्रांमध्ये अनुभव : माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना ग्राफिक डिझाइन, प्रोडक्ट डिझाइन, इंटिरियर डिझाइन, यूजर एक्सपिरीयन्स (UX) डिझाइन, आणि अॅनिमेशन यासारख्या विविध डिझाइन क्षेत्रांमध्ये अनुभव घेण्याची संधी मिळते. यामुळे त्यांना त्यांच्या आवडीचे डिझाइन क्षेत्र ओळखता येते आणि त्यांचे करिअर मार्ग निश्चित करता येतात.
डिझाइन शिक्षणामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज कसा प्रभावित होईल?
विद्यार्थी : विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक रंजक आणि मजेदार होईल. परीक्षांऐवजी ते प्रकल्प सादरीकरण आणि गट चर्चांची आतुरतेने वाट पाहतील आणि ते त्यांच्या शिक्षणात अधिक सक्रिय सहभागी होतील. डिझाइन शिक्षणामुळे त्यांची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होईल. यामुळे त्यांना भविष्यातील करिअरसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार करता येईल.
पालक : पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अधिक सहभागी होण्याची संधी मिळेल. ते डिझाइन प्रकल्पांमध्ये सहभागी होऊन आणि त्यांच्या मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या मुलांच्या सर्जनशीलतेला चालना देऊ शकतात. पालकांना त्यांची मुले शाळेतील प्रकल्पांबद्दल किंवा नवीन कल्पनांबद्दल उत्साहाने सांगताना दिसतील. ‘किती गुण मिळाले?’ यापेक्षा ‘आज तू काय नवीन शिकलास? कोणता सकारात्मक बदल घडवून आणलास?’ असे प्रश्न महत्त्वाचे ठरतील.
शिक्षक : शिक्षकांची भूमिका बदलून ते सुविधाकर्ते ( Facilitators) बनतील, हा नवीन दृष्टिकोन आव्हानात्मक पण संधीपूर्णही आहे. त्यांना आपल्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये (Pedagogy) बदल करून तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा लागेल, ज्ञान देण्यापेक्षा कुतूहल जागृत करणारे मार्गदर्शक व सहयोगी (Collaborator) बनावे लागेल.
समाज : नवीन शिक्षण धोरणावर आधारित डिझाइन शिक्षणामुळे समाजात अधिक सर्जनशील आणि नवीन कल्पनांना प्रोत्साहन मिळेल. डिझाइन शिक्षणामुळे विद्यार्थी अशा व्यक्ती बनतील ज्या समाजातील समस्या सोडवण्यासाठी आणि त्याला अधिक चांगले बनवण्यासाठी नवीन कल्पना आणि उपाय विकसित करू शकतात. जसजसे हे विद्यार्थी मोठे होतील, त्यांच्याबरोबर नवकल्पना आणि समस्या-निराकरणाची मानसिकता वाढेल. अशा समाजाची कल्पना करा जिथे लोक समस्यांबद्दल केवळ तक्रार करत नाहीत, तर त्यावर उपाय शोधण्यासाठी सक्रियपणे काम करतात.
नवीन शिक्षण धोरणावर आधारित डिझाइन शिक्षणाचे फायदे
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो : डिझाइन प्रकल्पांवर काम करून विद्यार्थी स्वत:च्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे धैर्य करतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
समस्या सोडवण्याची क्षमता वाढते: डिझाइन प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या समस्यांची नोंद घ्यावी लागते आणि त्यावर उपाय शोधावे लागतात. यामुळे त्यांची समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते.
संघ भावना वाढते : डिझाइन प्रकल्प अनेकदा गटामध्ये केले जातात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना आणि इतरांबरोबर काम करण्याची क्षमता वाढते.
सामाजिक जाणीव निर्माण होते : डिझाइन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना समाजातील विविध स्तरातील समस्यांचा विचार करण्यास प्रोत्साहित केले जाते. यामुळे त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते आणि समाजाची सुधारणा करण्याची इच्छा निर्माण होते.
पुढचा टप्पा
सारांशानी, नवीन शैक्षणिक धोरण आणि त्यातील डिझाइनवरील भर केवळ शिकवण्याची आणि शिकण्याची पद्धत बदलत नाही, तर शिक्षणाकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन आणि त्याद्वारे आपला समाज बदलत आहे. यामधूनच एक नवकल्पक आणि समस्या-निराकरण करणाऱ्यांची पिढी तयार होणार आहे. या बदलांच्या अंमलबजावणीच्या प्रवासात काही आव्हाने असली तरी, त्याचे फलित एक अधिक जिवंत, सृजनशील, प्रगतिशील आणि नवचैतन्याने समृद्ध भारत तयार होईल.