जनावरांची डॉक्टर बनली नसली तरी प्राणिप्रेम मयुरीच्या रक्तात भिनलेलं आहे असं तिच्या वडिलांच्या वेळोवेळी लक्षात आले. मुलगी मोठी झाली, छान मिळवती झाली, स्वत:च्या पायावर पुण्यासारख्या शहरात जाऊन स्थायिक झाली, यानंतर तिच्या आयुष्यात फार ढवळाढवळ करू नये, तिला जे हवे ते करू द्यावे या मताचा असल्यामुळे तिने शेल्टरची कल्पना मला सांगूनही वडिलांनी विरोध केला नाही.

कोणत्याही शेतकऱ्याला प्राण्यांवर प्रेम करा असं शिकवावं लागत नाही. सर्व प्रकारचे पाळीव प्राणी त्याच्या आसपास कायमच असतात. त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा तेही त्याला छान माहीत असते. जंगली प्राण्यांचा उच्छाद कसा असतो तेही त्याला काही वेळेला अनुभवावे लागते. रानडुकरे, कोल्हे, क्वचित बिबट्या या पासून स्वत:चे शेत आणि जीव कसा वाचवावा याचेही निसर्गदत्त उपजत ज्ञान शेतकऱ्याला असते. आम्ही भोरची जोशी मंडळी सात पिढ्या शेतीच करणारी. वाटण्यांमुळे माझ्याकडे आता फक्त पाच एकराची शेती राहिलीय. सुपीक शेत, भरपूर पाऊस असल्यामुळे भात शेती हाच प्रमुख उद्याोग मी लहानपणापासून करत आलो. माझ्या आठवणीतले भोर आता पूर्णपणे बदलले आहे. पण भोरपासून दहा कोसावर आमचे छोट गाव, शेती असल्याने तिथल्या वातावरणात फार बदल घडलेला नाही.

One Nation One Election BJP
One Nation One Election : मोठी बातमी! भाजपा २० खासदारांना बजावणार नोटीस; नेमकं कारण काय?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
BSF Recruitment 2024
BSF Recruitment 2024 : कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय मिळवा सैन्यात नोकरी! ८५,००० रुपये प्रति महिना मिळेल पगार
Loksatta editorial express rti top defaulters bank npa
अग्रलेख: कर्ज कर्तनकाळ!
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Pakistani Beggars in Saudi Arabia Freepik
हाय प्रोफाईल भिकारी ठरले पाकिस्तानची डोकेदुखी, मुस्लीम राष्ट्राच्या तडाख्यानंतर विमानप्रवासावर घातली बंदी

हे सगळं सांगण्याचं निमित्त मयुरीचं बालपण या ठिकाणी गेलं. त्यातूनच तिचं प्राण्यांवरचे प्रेम वाढत गेलं. या उलट तिच्या आईची अवस्था. वयाच्या विशीनंतर ती शेतीशी संबंधित घरात आली. मात्र याबद्दल तिने कुरकुर कधीच केली नाही. कामाचा भाग म्हणून घरातील सगळ्या प्रकारच्या पाळीव प्राण्यांची देखभाल करताना त्यांची भाषा, देहबोली आणि डोळ्यांतून व्यक्त होणारे भाव मला कळत. ते सारं मयुरी लहानपणापासून पाहात असल्यामुळे तिनेही या गोष्टी सहजपणे उचलल्या.

शेतावर बागडता बागडता मयुरीची शाळा संपली. भोरच्या कॉलेजात बारावीपर्यंत शिकायची सोय असल्यामुळे मोठी होईपर्यंत तिचे शिक्षण आमच्या ग्रामीण वातावरणात राहूनच झाले. शेतावरच्या आणि आसपासच्या प्राण्यांचा लळा लागल्यामुळे त्यांच्या आजारपणावर उपचार करणारा व्हेटर्नरी डॉक्टरचा अभ्यासक्रम करावा असे तिच्या मनाने पक्के ठरवले होते. मनाने ठरवणे आणि प्रत्यक्षात घडणे यात मोठाच फरक असतो हे आम्हा सगळ्यांना तिच्या बारावीच्या निकालानंतर कळले. मुलं काय म्हणतात त्या रस्त्याला जाण्याकरता काय काय करावे लागते याची कसलीच माहिती आम्हाला नव्हती.

भोर जवळच शिरवळला नवीन व्हेटर्नरी कॉलेज निघाले आहे एवढी जुजबी माहिती मयुरीने मिळवली होती.जशी शाळा संपली कॉलेज सुरू झाले तसेच बारावी संपल्यावर त्या कॉलेजमध्ये जायचे अशी काहीतरी भानगड असेल एवढेच आम्हाला माहिती. खरे तर तिने व्हेटर्नरी डॉक्टर हा शब्द वापरला असला तरी आमच्या शेतकऱ्यांच्या भाषेत गायीगुरांचा किंवा जनावरांचा डॉक्टर असाच आम्ही उल्लेख करत असतो. गाईचे बाळंतपण, म्हैस अडली तर, शेळ्या, बकऱ्या, मेंढ्या यांचे अचानक उद्भवणारे मोठे आजार आणि अलीकडे कृत्रिम रेतनाच्या पद्धती याच्याशी संबंधित असणारा माणूस म्हणजे व्हेटर्नरी डॉक्टर एवढीच आमची कल्पना.

शहरातील व्हेटर्नरी डॉक्टर कडे कुत्री मांजरे कौतुकाने नेणारी आणि माणसांपेक्षा या प्राण्यांवरती खर्च करणारी माणसं आम्ही पाहिली नव्हती. तिच्या आईचा तर याला ठाम विरोधच होता. कुर्त्याची भीती लहानपणापासून मनात बसलेली मयुरीची आई कायमच तिन इंजिनीअर व्हावं, चांगली नोकरी करावी या मताची होती. कोणत्याही डॉक्टरकीसाठी नीट नावाची खूप कठीण परीक्षा असते याची माहितीच आम्हाला नव्हती आणि मयुरीला असली तरी त्यासाठी कुठलाच क्लास भोरमध्ये उपलब्ध नव्हता. बारावी सायन्सला खूप छान मार्क मिळवलेला तिचा सगळा वर्ग नीट परीक्षेत जेमतेम मार्कानेच पास झाला. मात्र गणित विषय न सोडलेल्या काही मुला मुलींना इंजिनीअरिंगच्या सीईटी प्रवेश परीक्षेतून प्रवेश मिळाला. यामुळे मयुरीच्या आईला खूप आनंद झाला, तर मयुरी जनावरांच्या डॉक्टरच्या रस्त्याला जाणार नाही म्हणून मला बरे वाटले.

चार वर्षे कात्रजच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये तिने काढले आणि तिला खराडीला आयटीत सुंदर नोकरी लागली. मयुरीच्या आईला तिच्या लग्नाचे वेध लागले होते. अमेरिकेत काम करणारी मुल तिने शोधायला सुरुवात पण केली होती. मयुरीचं माझ बोलणं व्हायचं त्या वेळेला तिच्या मनातील काही कल्पना ती मला कायम बोलून दाखवत असे. जनावरांची डॉक्टर बनली नसली तरी प्राणिप्रेम तिच्या रक्तात भिनलेलं आहे असं माझ्या वेळोवेळी लक्षात आले. मुलगी मोठी झाली, छान मिळवती झाली, स्वत:च्या पायावर पुण्यासारख्या शहरात जाऊन स्थायिक झाली, यानंतर तिच्या आयुष्यात फार ढवळाढवळ करू नये, तिला जे हवे ते करू द्यावे या मताचा मी असल्यामुळे तिने शेल्टरची कल्पना मला सांगून मी विरोध केला नाही, पण हा विषय तिच्या आईकडे बोलत बसलो नाही हे मात्र खरे. मयुरीच्या शेल्टरच्या बातम्या, युट्युब वरची तिची मुलाखत आणि तिच्या आगळ्यावेगळ्या कामाचं कौतुक हे मात्र माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला सुखावून जाते, एवढे मात्र खरे.

Story img Loader