डॉ.श्रीराम गीत

माझे शिक्षण बीई आयटी २०२३ साली पूर्ण झाले. त्याच वर्षी माझी कॅम्पसमधून एका नामांकित कंपनीत निवड झाली. पण मला अजूनपर्यंत काम मिळालेले नाही. त्यादरम्यान मी विविध कंपन्यांच्या मुलाखती दिल्या व त्यातून माझी एका कंपनीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवड झाली. हे पद स्वीकारावे का नाही या संभ्रमात मी आहे. मला एमबीए करायचे आहे. त्यासाठी सीईटी परीक्षेची तयारी सुरू केली आहे. नोकरी करत असताना मी तयारी जमेल का? – शिवानी देसाई

सेल्स एक्झिक्युटिव्हची नोकरी स्वीकारायला काहीच हरकत नाही. नोकरी करताना सहज अभ्यास करून २०२४ ची एमबीए सीईटी दे. कोणची संस्था मिळते त्यावर प्रवेश घ्यायचा की नाही हे अवलंबून राहील. कॅम्पस मधून दिलेले ऑफर लेटर प्रत्यक्षात हाती आले तर तिथे जॉईन व्हायचे की नाही हा खूप नंतरचा प्रश्न आहे. अशी टांगलेली अवस्था असलेली अनेक मुले मुली आहेत. एमबीए का करावयाचे? याबद्दल तुझ्या मनात असलेल्या साऱ्या अपेक्षांबद्दल नीट माहिती घेऊन त्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्तींना भेटून निर्णय घ्यावा असे सुचवत आहे.

Story img Loader