टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरींग सेंटर ( TEC) (भारत सरकार, दळणवळण मंत्रालय, दूरसंचार विभाग), नवी दिल्ली अंतर्गत TEC इंटर्नशिप स्कीमसाठी प्रवेश. ( Notification No. १-१२/ २०२४- Pers./ TEC dt. १५.१०.२०२४)

पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन्स/ टेलीकम्युनिकेशन/ रेडिओ/ आयटी/ कॉम्प्युटर्स/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग किंवा संबंधित डिसिप्लिनमधील पदवीच्या तिसऱ्या/ चौथ्या वर्षात शिकणारे ज्यांनी किमान ६० टक्के गुण मिळविले आहेत.

PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
KTCL Goa Bharti 2024 Job Opportunity in KTCL Recruitment
KTCL Goa Bharti 2024 : KTCLमध्ये नोकरीची संधी! कंडक्टरच्या ७० पदांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?

किंवा ज्यांनी संबंधित विषयातील इंजिनिअरींग पदवी/पदव्युत्तर पदवी मागील एक वर्षाच्या आत किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केली आहे.

उमेदवारांकडे स्वतचे लॅपटॉप असणे आवश्यक. त्यांना कामासाठी लागणारी जागा, तेथील इंटरनेट फॅसिलिटी आणि त्यांच्या गरजा संबंधित डिव्हीजनच्या मुख्य अधिकाऱ्याकडून पुरविल्या जातील.

इंटर्नशिपचा कालावधी : सहा महिन्यांचा असेल जो आणखी १२ महिन्यांपर्यंत वाढविला जाऊ शकतो.

वर्षातून दोन वेळा इंटर्नची भरती केली जाते. एका वेळेला जास्तीत जास्त २५ इंटर्न्स TEC च्या विविध टेक्निकल डिव्हीजन्समध्ये घेतले जातात. (TEC च्या देशभरातील २० टेक्निकल डिव्हिजन्स आणि ४ रिजनल ऑफिसेसमध्ये कोणत्या क्षेत्रात संशोधन केले जाते याची यादी https:// tec. gov. in/ या संकेतस्थळावरील जाहिरातीमधील Annexure- I आणि दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केलेल्या शुद्धिपत्रकात उपलब्ध आहे, तसेच अर्जाचा विहीत नमुना Annexure- II मध्ये उपलब्ध आहे. Annexure- IV मध्ये डिव्हीजननुसार किती इंटर्नची आवश्यकता आहे याची यादी दिली आहे. इंटर्नशिप दरम्यान मिळणारा मोबदला (remuneration) रु. १५,०००/- दरमहा.

सर्टिफिकेट ऑफ इंटर्नशिप : कामाची योजना आणि कामाचे वेळापत्रक सुपरवायझर यांचेकडून दिली जाईल. ज्याचे इंटर्नने नेहमीच पालन करणे आवश्यक आहे. इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर आणि संबंधित डिव्हीजनच्या सक्षम अधिकाऱयाने स्विकारलेला, सही केलेला अहवाल (report) सबमिट केल्यावर त्यांना इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट (Annexure- III) दिले जाईल.

उमेदवारांनी इंटर्नशिपसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी TEC वेबसाईटवरील ( www. tec. gov. in) विस्तृत माहिती वाचून आपण कोणत्या क्षेत्रात काम करू इच्छिता हे अर्जात नमूद करावे.

निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांचा प्रत्यक्ष/टेलिफोनिक इंटरह्यू घेतला जाईल. नेमणूकीपूर्वी सद्यास्थितीत शिकत असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थेचे सुपरवायझर/हेड ऑफ डिपार्टमेंट यांचेकडील लेटर (ज्यात ना हरकत दर्शविलेली असेल) सादर करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज www. tec. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकमधून दि. २९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत करावेत.

विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्जाची स्कॅण्ड कॉपी (www. tec. gov. in वरील Annexure- II) आवश्यक त्या कागदपत्रांसह PDF Format मध्ये ( file name same as Applicant name) (maximum file size १० MB) अपलोड करणे आवश्यक.