ऋषिकेश बडवे

विद्यार्थी मित्रांनो, मागील लेखात आपण २०२३ मध्ये झालेल्या यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मध्ये विचारलेल्या काही प्रश्नांच्या नमुना उत्तरांची चर्चा केली. आजच्या लेखामध्येही या प्रश्न पत्रिकेतील आणखी काही प्रश्नांच्या नमुना उत्तरांची चर्चा करणार आहोत.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Ajit Pawar, sugar factory, Amit Shah allegation,
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा, अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Sagar Meghes pointed speech front of nitin gadkari is getting discuss
‘तीनदा पराभव, डॉक्टर अन् राजकारणाचा किडा…’ सागर मेघे यांच्या टोकदार भाषणाची गावभर चर्चा…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?

Q : How does e- Technology help farmers in production and marketing of agricultural produce? Explain it. (Answer in 150 words)

इ-तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने फायद्याचा ठरू शकतो हा कृषी अर्थशास्त्र अभ्यासक्रमातील एक घटक आहे. या घटकाची तयारी करताना चालू घडामोडीवर लक्ष देणे व त्यातही सरकारद्वारे तसेच प्रगतीशील शेतकऱ्यांद्वारे तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जात आहे याचा मागोवा घेत रहाणे गरजेचे असते. अशा पद्धतीनेच आपण या घटकावरील प्रश्नांना हाताळू शकतो. वरील प्रश्नाचे दोन भाग पडतात. उत्पादनासाठी मदत करणारे इ-तंत्रज्ञान व विपणनासाठी मदत करणारे इ-तंत्रज्ञान. उत्पादनामध्ये प्रिसिजन फार्मिगचा वापर केला जाऊ शकतो, त्याचबरोबर सरकार, विविध संशोधन व विकास संस्था यांच्याद्वारे निर्माण केलेले नवनवीन तंत्रज्ञान व सुधारित कृषी कार्यक्रम व पद्धती यांची माहिती शेतकऱ्यापर्यंत परिणामकारकपणे पोहोचण्यासाठी इ-तंत्रज्ञानाचे योगदान, त्याचबरोबर डिजिटल बँकिंगद्वारे केलेली वित्त पुरवठय़ाची सोय या सर्व गोष्टी कृषी उत्पादकतेला व उत्पादनाला मोठा हातभार लावू शकतात. हे उत्तराच्या पूर्वार्धात लिहिणे गरजेचे आहे. उत्तराच्या उत्तरार्धात विपणनासाठी इ-तंत्रज्ञानाची मदत यावर भर द्यावा. त्यातून प्रामुख्याने इ-नाम, ऑनलाइन मार्केटिंग, संघटित किरकोळ विक्री साखळी, शेतकरी उत्पादक संघटना व सहकार यांच्या माध्यामातून होणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर अधोरेखित करणे गरजेचे आहे. उत्तराचा शेवट करताना यातील समस्या व त्यावरील पर्याय थोडक्यात लिहावेत.

Q : State the objectives and measures of land reforms in India. Discuss how land ceiling policy on landholding can be considered as an effective reform under economic criteria. (Answer in 150 words)

यूपीएससी मुख्य परीक्षेत बहुतांश वेळा जे प्रश्न विचारले जातात ते अभ्यासक्रमातील मुद्दय़ांच्या अनुप्रयोगांवर विचारले जातात. खूप क्वचित वेळा अभ्यासक्रमातील मुद्दय़ांवर सरळ सरळ प्रश्न विचारले जातात. परंतु कृषी अर्थशास्त्र मात्र याला काहीसे अपवाद असल्याचे आढळून येते. या भागातील प्रश्न बऱ्याच वेळा अभ्यासक्रमातील मुद्दय़ांवर सरळ सरळ विचारलेले दिसतात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे वरील प्रश्न होय. यामध्ये जमीन सुधारणा म्हणजे काय हे सर्वप्रथम स्पष्ट करावे. येथे अपेक्षित उत्तरात जमीन सुधारणा हे विविध राज्य सरकारांच्या प्रयत्नांतून व केंद्र शासनाच्या प्रोत्साहनातून निर्माण आलेल्या राज्यनिहाय स्वतंत्र कायद्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न नसून त्या सर्व कायद्यांची एकंदर रूपरेषा समजून सुधारणांची उद्दिष्टे स्पष्ट करून त्यांचे पाच श्रेणींमध्ये म्हणजेच १. मध्यस्थांचे उच्चाटन २. भाडेकरार नियमन ३. कमाल जमीन धारणा ४. विखुरलेल्या जमिनींचे एकत्रीकरण आणि ५. सहकारी शेतीला चालना थोडक्यात स्पष्टीकरण लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर कमाल जमीन धारणा या श्रेणीबद्दल विस्तारात लिहून, १९५० च्या दशकातील राज्य सरकारांचे प्रयत्न व १९७० मध्ये संसदेने कमाल जमीन धारणा संदर्भात समानता आणण्याच्या प्रयत्नांबाबत उल्लेख देखील गरजेचा आहे. ते स्पष्ट झाल्यावर कमाल जमीन धारणा कायद्यांचे परिणाम स्पष्ट करावे.

परिणाम स्पष्ट करताना आर्थिक बाजूंवर जास्त भर द्यावा ज्यामध्ये जमिनीचे पुनर्वाटप व जमिनीचा इष्टतम वापर, दारिद्रय़ निर्मूलन, आधुनिक शेतीला चालना, हरितक्रांतीच्या साथीने छोटय़ा शेतजमिनीची वाढलेली उत्पादकता आणि त्यामुळे छोटय़ा व सीमांत शेतकऱ्यांना प्राप्त झालेली आर्थिक व्यवहार्यता यांवर विशेष भर देणे गरजेचे राहील. कारण प्रश्नामध्ये त्याच बाजूवर भर दिलेला आढळून येतो. सरतेशेवटी या कायद्यांच्या अंमलबजावणीमधील त्रुटी स्पष्ट करून स्वत:चे मत मांडले तर उत्तराला वेगळेपण प्राप्त होऊ शकते.

Q : Most of the unemployment in India is structural in nature. Examine the methodology adopted to compute unemployment in the country and suggest improvements. (Answer in 250 words).

बेरोजगारी हा अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा घटक आहे. वरील प्रश्न सोडविण्यासाठी बेरोजगारीचे विविध प्रकार आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. उत्तराची सुरुवात बेरोजगारीच्या व्याख्येने करून बेरोजगारीची संकल्पना स्पष्ट करावी. त्यानंतर बेरोजगारीच्या प्रकारांचा थोडक्यात उल्लेख करून संरचनात्मक बेरोजगारीची संकल्पना स्पष्ट करावी. स्पष्टीकरण लिहित असताना अर्थव्यवस्थेतील रचनात्मक समस्या जसे की प्राथमिक क्षेत्राकडून तृतीय क्षेत्राकडे झालेली वाटचाल व त्यामुळे काहीसे विकसित न होऊ शकलेले द्वितीय क्षेत्र, कृषी क्षेत्रातील प्रच्छन्न बेरोजगारी, लोकसंख्येकडील प्रभावी शिक्षण व कौशल्याचा अभाव, दारिद्रय़, उद्योग जगाला असलेली गतिशील मानवी भांडवलाची व इतर भांडवलाची गरज व देशामधील या भांडवलाचा अभाव इत्यादी अनेक संरचनात्मक त्रुटींमुळे दिसून येणाऱ्या बेरोजगारीचा विस्तार थोडक्यात करावा. त्यानंतर बेरोजगारी मोजमाप करण्याची पद्धत म्हणजेच ठररड कडून केले जाणारे नेहमीच्या स्थितीचा दृष्टिकोन, साप्ताहिक स्थितीचा दृष्टिकोन आणि वर्तमान दैनिक स्थितीचा दृष्टिकोन इत्यादींची माहिती द्यावी, व शेवटी त्यातील त्रुटी सांगून त्यावर मार्ग सुचवावे.