सुहास पाटील

१) महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागांतर्गत लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील (गट-क) पदांची सरळसेवा भरती. एकूण रिक्त पदे – २५५. Advt.  No. rsrzq/ Section r(३)/२०२३)

There are signs that Chief Ministers Youth Work Training Scheme is also going to be closed
मुख्यमंत्र्यांचे हजारो लाडके भाऊ बेरोजगार होणार? काय आहे कारण?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Article about obcs dominate government job recruitment
लोकजागर : ओबीसींची ‘सर्वोच्च’ अडवणूक!
ITBP Recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : ‘आयटीबीपी’त ५१ पदे रिक्त
Bhabha Atomic Research Centre
नोकरीची संधी
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
Job Opportunity Recruitment at State Bank
नोकरीची संधी: स्टेट बँकेत भरती

(१) लिपिक – १२५ पदे  (२) वरिष्ठ लिपिक – ३१ पदे पद क्र. १ व २ साठी पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण.

(३) लघुलेखक निम्न श्रेणी – ४ पदे

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि शॉर्टहँड स्पीड १०० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन स्पीड ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.

(४) मिश्रक (फार्मासिस्ट) – २७ पदे

पात्रता – १० वी/१२ वी उत्तीर्ण व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण. तसेच फार्मसी काऊन्सिलकडे नोंदणी.

(५) शिक्षक – १२ पदे   पात्रता – १० वी/१२ वी उत्तीर्ण व शिक्षण पदविका उत्तीर्ण.

हेही वाचा >>> शिक्षणाची संधी : भारतीय नौदलामध्ये बी.टेक.

(६) शिवणकाम निदेशक – १० पदे  पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे वा समतूल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र.

(७) सुतारकाम निदेशक – १० पदे  पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय सुतारकाम ट्रेडचे प्रमाणपत्र. अनुभवचे प्रमाणपत्र .

(८) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ८ पदे   पात्रता – १२ वी विज्ञान उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रमाणपत्र.

(९) बेकरी निदेशक – ४ पदे  पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि बेकरी आणि कन्फेक्शनरीमध्ये क्राफ्ट मॅनशिप प्रमाणपत्र, अनुभव आवश्यक.

(१०) ताणाकार – ६ पदे  पात्रता – १० वी/१२ वी व महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे अथवा समतूल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वार्फिग मशिनवर सूत कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

(११) विणकाम निदेशक – २ पदे पात्रता – शासनमान्य संस्थेमधून विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षांचा कामाचा अनुभव.

(१२) चर्मकला निदेशक – २ पदे  पात्रता – १० वी उत्तीर्ण. महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतूल्य फूट वेअर निर्मितीचे प्रमाणपत्र. 

हेही वाचा >>> SAI Recruitment 2024 : स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये होणार मोठी भरती! ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज

(१३) यंत्र निदेशक – २ पदे  पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि मशिनिस्ट ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. (१४) ते (२५) प्रत्येकी १ पद असलेली पदे या विषयी सविस्तर माहिती http://www.mahaprisons.gov.in या वेबसाईटवरील जाहिरातीमधील परिशिष्ट-१ मध्ये उपलब्ध आहे.

आरक्षण – एकूण रिक्त पदांच्या ३० टक्के पदे महिलांसाठी, १५ टक्के पदे माजी सैनिकांसाठी, १ टक्के पदे अनाथांसाठी,

४ टक्के पदे दिव्यांगांसाठी इ. आरक्षित आहेत.

वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०२४ रोजी) खुला प्रवर्ग – १८-३८ वर्षे, मागासवर्गीय/खेळाडू – १८-४३ वर्षे, दिव्यांग ४५ वर्षे.

निवड पद्धती – लिपिक/वरिष्ठ लिपिक पदांसाठी ऑनलाइन (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एकूण १०० प्रश्न व २०० गुण, वेळ २ तास. मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित प्रत्येकी २५ प्रश्न, प्रत्येक प्रश्न २ गुणांसाठी.

इतर पदांसाठी लेखी परीक्षेत ६० प्रश्न, एकूण १२० गुण, वेळ २ तास.

लघुलेखक निम्न श्रेणी व अ.क्र. ४ ते २५ पदांसाठी ८० गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. ऑनलाइन अर्ज http://www.mahaprisons.gov.in या संकेतस्थळावर दि. २१ जानेवारी २०२४ (२३.५५ वाजे)पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com

Story img Loader