MAHA DES Bharti 2023: अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत २६० पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव –
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क
एकूण पद संख्या – २६०
शैक्षणिक पात्रता –
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब –
सांख्यिकी / बायोमेट्रिक्स / गणित / अर्थशास्त्र / अर्थमिती / गणितीय अर्थशास्त्र / वाणिज्य मध्ये पदव्युत्तर पदवी
सांख्यिकी सहाय्यक गट क –
गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / अर्थमिति / सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी.
अन्वेषक गट क – १० वी पास.
शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.
हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! कृषी विभागात ‘या’ पदांच्या २१८ जागांसाठी भरती सुरु
नोकरीचे ठिकाण – मुंबई</strong>
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे
- राखीव प्रवर्ग – १८ ते ४३ वर्षे.
अर्ज पद्धती – ऑनलाईन.
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची सुरुवात तारीख – १५ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ ऑगस्ट २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.mahades.maharashtra.gov.in
पगार –
- सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब -३८ हजार ६०० रुपये ते १ लाख २२ हजार ८०० रुपयांपर्यंत.
- सांख्यिकी सहाय्यक गट ककार्यकर्ता – २९ हजार २०० रुपये ते ९२ हजार ३०० रुपयांपर्यंत.
- अन्वेषक गट क – २५ हजार ५०० रुपये ते ८१ हजार १०० रुपयांपर्यंत.