MahaGenco / Mahanirmiti Bharti 2023: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (MAHAGENCO) येथे काही जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या जागांबाबतची अधिसूचना कंपनीकडून जारी करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना http://www.mahagenco.in या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडमध्ये अधिकारी, सहाय्यक अधिकारी, महाव्यवस्थापक, सेवानिवृत्त अभियंता या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पदांनुसार अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७, ३१ मार्च आणि १० एप्रिल २०२३ अशी असेल. इच्छुक उमेदवारांनी भरतीबाबतच्या अधिकच्या आणि सविस्तर माहीतीसाठी https://mahasarkar.co.in/mahagenco-recruitment/ या लिंकला भेट द्यावी.

हेही वाचा- भारतीय संसदेत काम करण्याची सुवर्णसंधी; लोकसभेत ‘या’ पदासांसाठी होणार भरती, आजच अर्ज करा

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित भरती २०२३

पदाचे नाव – अधिकारी, सहाय्यक अधिकारी, सरव्यवस्थापक, सेवानिवृत्त अभियंता.

एकूण जागा – ५५

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची सुरुवात – ८ मार्च २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७, ३१ मार्च आणि १० एप्रिल प्रत्येक पोस्टनुसार या तारखा वेगवेगळ्या आहेत. कंपनीच्या बेवसाईवर याबाबतची अधिकची माहिती जाणून घ्या.

हेही वाचा- इंजिनिअर्सना जॉबची मोठी संधी; भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये ११० जागांसाठी भरती सुरु, इथे करा अर्ज

शैक्षणिक पात्रता –

  • अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी.
  • सहाय्यक अधिकारी- मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी.
  • महाव्यवस्थापक – CA/ICWA उत्तीर्ण
  • सेवानिवृत्त अभियंता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील पदवी.

वयोमर्यादा –

५३ ते ६२ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

जाहिरात पाहण्यासाठी https://www.mahagenco.in/eerteels/2023/03/Advt-04_2023-08.03.2023.pdf या लिंकला भेट द्या.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०० ०१९

कंपनीकडून कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) या पदावर देखील भरती केली जाणार आहे. ती ३४ जागांसाठी असेल. तर कनिष्ठ अधिकारी पदासाठीचे पात्रता निकष जाणून घेऊया.

शैक्षणिक पात्रता –

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

वयोमर्यादा –

या पदासाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

पगार –

३७ हजार ३४० रुपये ते १ लाख ३ हजार ३७५ रुपयांपर्यंत.

अधिकच्या माहितीसाठी कंपनीची अधिकृत बेवसाईट https://www.mahagenco.in/ ला अवश्य भेट द्या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahagenco bharti 2023 great opportunity for graduates to work in maharashtra electrical department jap
Show comments