MAHAGENCO Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (MAHAGENCO) येथे काही जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या जागांबाबतची अधिसूचना कंपनीकडून जारी करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार कंपनीने दिलेल्या पत्यावर अर्ज करु शकतात. या अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क याबाबतची सर्व माहिती जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाजनको भरती २०२३ साठी कंपनी मुख्य अभियंता पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. या पदासाठीची वयोमर्यादा कमाल ५० वर्षांपर्यंतची आहे. तर MAHAGENCO जाहिरातीनुसार, निवडलेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी ग्रेड-I वर मासिक पगार मिळणार आहे.

हेही वाचा- इंजिनियरिंग पास आहात? तर आजच ‘या’ यूनिवर्सिटी मध्ये नोकरीसाठी अर्ज करा; १.७५ लाखांपर्यंत मिळेल पगार

कंपनीने पात्र उमेदवाराने त्यांचे रीतसर भरलेले अर्ज पाठवायला सांगितलं आहे. महत्वाची बाब म्हणजे मुदतीनंर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला वेळेत अर्ज करणं बंधणकारक राहणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२३ ही आहे. त्यामुळे उमेदवारांना या तारखेआधी आपले फॉर्म भरावे लागणार आहेत.

सविस्त PDF साठी – https://studycafe.in/wp-content/uploads/2023/02/Advt-No-01-B-2022-CE-re-advt.pdf या लिंकवर जा

या पदांसाठी भरती –

MAHAGENCO भरती २०२३ च्या अधिसूचनेनुसार, मुख्य अभियंता पदांवर भरती केली जाणार आहे. या पदासाठीच्या एकूण ९ जागा आहेत.

वयोमर्यादा –

या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

हेही वाचा- १० वी पास आहात? रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, परीक्षा नाही, अर्ज करताना या गोष्टींची काळजी घ्या

पात्रता –

पात्र उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकी/पॉवर इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी या विषयात बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क –

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ८०० + १४४ इतके शुल्क भरावे लागेल.

राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ६०० + १०८ इतके शुल्क भरावे लागेल.

असा करा अर्ज –

MAHAGENCO भरती २०२३ च्या अधिसूचनेनुसार, वर नमूद केलेल्या पात्र उमेदवारांनी २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर पोहोचवणे आवश्यक आहे.

हेही वाचा- Bank Of India मध्ये ५०० जागांवर बंपर भरती; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता निकष

यासाठी उमेदवारांकडे वैध वैयक्तिक Email ID / मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.

तसेच जर उमेदवारांकडे वैयक्तिक Email ID नसल्यास, अर्ज करण्यापूर्वी त्यांनी नवीन ईमेल आयडी तयार करावा.

आरक्षित प्रवर्गांतर्गत अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र, जात वैधता, चालू वर्षाचे नॉनक्रीमी लेयर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

पत्ता –

“सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपॅन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०० ०१९.”

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahagenco recruitment 2023 for chief engineer check vacancies eligibility and other details jap
Show comments