MSBSHSE Maharashtra Board 10th 12th Result 2024 Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBHSE) इयत्ता 10 वी आणि 12 वीचे निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीत. विद्यार्थी MSBHSE निकालाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत असताना आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून घोषणा होताच विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर त्यांचे गुण तपासू शकतात याशिवाय डिजिलॉकर, एसएमएसने सुद्धा आपले गुण तपासून पाहू शकतात. या निकालामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयनिहाय गुणांविषयी, एकूण सरासरी टक्केवारीविषयी माहिती मिळेल पण याव्यतिरिक्त बोर्डाकडून एक महत्त्वाची यादी यंदा मात्र जाहीर केली जाणार नाही असे समजतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Maharashtra 10th 12th Result Dates: १० वी, १२ वी चा निकाल पाहण्यासाठी आवश्यक तपशील

आतापर्यंत, MSBHSE निकालाच्या तारखेशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी तो mahresult.nic.in, msbshse.co.in आणि hscresult.mkcl.org वर तपासू शकतात. विद्यार्थ्यांनी वेबसाइट उघडल्यानंतर त्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईच्या नावासह त्यांचे ओळखपत्र वापरून लॉग इन करता येणार आहे. इथे आपण खालील स्टेप्स फॉलो करून आपला निकाल पाहू शकाल.

महाराष्ट्र बोर्ड 10 वी 12 वी निकाल 2024 : निकाल साईटवर कसा तपासायचा?

  • अधिकृत वेबसाइटला mahresult.nic.in वर भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC, HSC निकाल 2024 लिंक तपासा.
  • लॉग इन तपशील ऍड करून सबमिट वर क्लिक करा.
  • एंटर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.
  • निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.

१० वी, १२ वीचा निकाल जाहीर होणार, पण ‘ही’ यादी नाही!

दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाच्या घोषणेनंतर, बोर्ड विज्ञान, कला आणि वाणिज्य यासह विविध शाखांमधील परीक्षेतील टॉपर्सची घोषणा करणार नाही असे समजतेय. विद्यार्थ्यांमधील नकारात्मक स्पर्धा टाळण्यासाठी बोर्डाकडून मागे असा निर्णय घेण्यात आला होता.

निकालाचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा

हे ही वाचा << Maharashtra 10th, 12th Results 2024: १० वी, १२ वीच्या निकालाबाबत बोर्डाकडून मोठी अपडेट; तारखांबाबत अधिकारी काय म्हणाले?

२०२४ मध्ये महाराष्ट्रात १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे तर १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. सीबीएसई व आयसीएसईने दहावी व बारावीचे निकाल जाहीर केल्यावर महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी सुद्धा आता निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. MSBSHSE नियमांनुसार, बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण घोषित होण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी आणि तोंडी परीक्षांमध्ये मिळून किमान ३५ % गुण मिळणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra 10th 12th result 2024 dates updates board unlikely to declare toppers list direct link to check hsc marks mahresult nicin svs