स्पर्धा परीक्षेत यश म्हणजे सर्वस्व या मानसिकतेतून बाहेर पडणे आवश्यक आहे. आपल्याला यशाच्या व्याख्या बदलाव्या लागतील. चांगला माणूस म्हणून जगणे, कष्ट करणे आणि कष्टाचा एकेक रुपया हे सामाजिक यश मानणारा समाज आपण निर्माण करणार आहोत का? प्रामाणिकपणा, सभ्यता, आपुलकी, समता, बांधिलकी ही मूल्ये वृद्धिंगत करणे ही सर्वात महत्त्वाची सामाजिक परीक्षा नाही का? ‘Survival of the fittest’ कडून सर्वोदयाकडे जाण्याचा मार्ग सोपा नाही. पण समाज म्हणून आपल्याला कधी ना कधी तो स्वीकारावा लागेल… याबद्द्ल सांगत आहेत महाराष्ट्राचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर…

मी माझा यूपीएससीचा निकाल लागल्यापासून एक तत्व पाळत आलोय. शक्यतो स्पर्धा परीक्षेतल्या यशाबद्दल भाषणबाजी करायची नाही. अभ्यासाबद्दल बोलायचे. विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान असले पाहिजे, यासाठी प्रयत्न करायचा. आयएएस होणे एक मोठी संधी आहे. पण ती संधी सर्वोच्च नाही. आपण कोणीही हिरो नाहीत आणि १ टक्क्यांहून कमी निकाल असणाऱ्या परीक्षेत नव्व्यांनवांचे काय हा प्रश्न कायम विचारण्याचा माझा आग्रह आहे. आत्मस्तुती म्हणून स्वत:चा प्रवास सांगणे अपेक्षित नाही. पण स्पर्धा परीक्षांच्या स्पर्धेत अपयश आल्याने टोकाचा मार्ग स्वीकारणाऱ्या तरुणाईला काही गोष्टी समजावून सांगणे हा हेतू नक्कीच आहे.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Education Institute Quality, Education Institute ,
अशा वातावरणात कशी वाढणार शिक्षणाची गुणवत्ता?
Success Story Of IAS Siddharth Palanichamy
Success Story: यूपीएससीच्या अभ्यासासाठी सोशल मीडियाची मदत; पहिल्याच प्रयत्नात भरघोस यश; वाचा, देशातील सर्वांत तरुण IAS ची गोष्ट
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Mumbai police latest news in marathi
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना

मी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलो. वयाच्या ५ वर्षापर्यंत मी पानगाव नावाच्या गावात वाढलो. त्यानंतर १२ वीपर्यंतचे शिक्षण लातूर शहरात झाले. मी पहिली ते नववीपर्यंत वर्गात पहिला किंवा दुसरा असायचो. स्कॉलरशिप, एमटीएस आदी परीक्षेत कधीही अपयश पाहिले नाही. त्यातून एक अहंकाराची भावना माझ्यात तयार झाली होती. मात्र, आई-बाबांनी मला तिसरीमध्ये असतानाच लायब्ररी लावून दिलेली होती. त्यामुळे पुस्तके वाचण्याचा छंद लागला होता. सातवीत असताना ‘आठवणींचे पक्षी’ हे प्र. ई. सोनकांबळे यांचे आत्मकथन वाचनात आले. खरंतर त्याने मला जमिनीवर आणले. समाजात विषमतेच्या झळा सोसत जगण्याच्या मूलभूत अधिकारासाठी माझ्याच वयाच्या मुलाला कसे झगडावे लागत होते हे हादरवणारे होते.

हेही वाचा >>> TJSB Sahakari Bank recruitment : टीजेएसबी बँकेत ‘या’ पदासाठी भरती! माहिती पाहा

पुढे दहावीला एका मार्काने माझे मेरिट गेले. खरंतर दहावी हा लातूर पॅटर्नमध्ये टर्निंग पॉइंट मानला जातो. अपयश स्वीकारता आले पाहिजे हे जाणवले. आता जाणवते की अपयश पचवता येणे, अपयशाची जबाबदारी घेणे हेच यश. लातूरला अकरावी सायन्सला प्रवेश घेतला. मात्र पुढे बारावीला माझे गुण ९० टक्क्यांवरून ७० टक्क्यांवर आले. ट्युशन क्लास, बारा तासांचे कॉलेज, असे वातावरण असतानाही माझे मेरिट घसरले. पुण्यातील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात सरकारी जागांवर मला अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळाला. खरंतर मी ही दुसरी चूक केली की, इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. कारण मला मराठी विषयाची आवड होती म्हणून पर्यायी शिक्षणासाठी मुक्त विद्यापीठात बीएला प्रवेश घेतला. इंजिनीअरिंगला मला ५०-५५ टक्के मार्क मिळत होते. फायनल वर्षात काही कारणांमुळे कॉलेज सोडले. इंजिनीअरिंगचे चार वर्ष घालवून आता नोकरी मिळण्याची शक्यता नव्हती. सामाजिक शास्त्रांमध्ये असलेल्या आवडीतून मी स्पर्धा परीक्षांच्या तयारीस लागलो. मात्र स्पर्धा परीक्षांच्या अनिश्चितते मुळे यूपीएससी/एमपीएससी बरोबरच एलआयसी, एसबीआयपासून वेगवेेगळ्या ठिकाणी लिपिकापासून ऑफिसरपदापर्यंत परीक्षा देत होतो. हाच प्लॅन बी. आपल्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी आपणच घेण्याची तयारी असली पाहिजे.

आयएएसच्या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत गेलो. गाइड्स, नोट्स याचा आधार न घेता मूळ संदर्भ साहित्य आणि स्वत:च्या नोट्स अशाप्रकारे तयारी केली. दुसऱ्या प्रयत्नात पासही झालो. ज्या वर्षी यूपीएससीमध्ये माझी निवड झाली त्या वर्षी एमपीएससी मुख्य परीक्षेत कट ऑफ गुणांपेक्षा फक्त एक गुण कमी असल्याने मी नापास झालो होतो. याचाच अर्थ स्पर्धा परीक्षेत असलेल्या अनिश्चिततेचा सामना आपल्याला करावा लागतो. मात्र यात किती वर्षे द्यायची याचा साधकबाधक विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आज एका शासकीय पदावर कार्यरत असताना हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की खासगी क्षेत्रापेक्षा शासकीय सेवेत पगार कमी आहेत. जबाबदारी अधिक आहे. व्यवस्था एक दोन लोकांनी बनत नाही. ती असंख्य लोक, विचार, नियम, संस्था यातून आकाराला येते. तिला चेहरा म्हटलं तर असतो, म्हटलं तर नसतो. यामुळे आपण ज्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी येऊ पाहतो त्या सोबत काही मर्यादाही आपल्याला समजून घ्याव्या लागतील.

हेही वाचा >>> UPSC EPFO ​​JTO 2024: मुलाखत फेरीसाठी उमेदवारांची यादी जाहीर; लगेच तपासा

पण शासकीय नोकरीच्या पलीकडेही एक जग असते. आपल्या मागे आपले घर असते. प्रत्येकाचा संघर्ष तितकाच महत्त्वाचा असतो. पण तो आपल्या जवळच्या लोकांपेक्षा महत्त्वाचा खरंच नाही. निराशेच्या एका क्षणी त्यांचा विचार केला पाहिजे. आपल्या आजूबाजूला स्पर्धा परीक्षांच्या लांब, थकवणाऱ्या प्रक्रियेत संधीची वाट पाहत असणारी अनेक तरुण मंडळी दिसतील. त्यांच्याशी संवाद साधत राहावे लागेल.

आपल्याकडे आजकाल भाषा आणि सामाजिक शास्त्रातही १०० टक्के गुण मिळतात. काही महाविद्यालयांचे प्रवेशाचे मेरिट ९९ टक्के असते. मग पुढे चालून त्यातले काही थोडे मेडिकल इंजिनीअरिंगच्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. इतर मागे पडतात. यशस्वी लोकांमधून अजून थोडे यशस्वी उरतात. सतत पुढे जाण्याच्या स्पर्धेत शेवटी जीवन नावाच्या चाकोरीच्या मर्यादेचे भान विद्यार्थ्यांना आणून देण्यात आपण कमी पडतो आहोत.

आपल्या जगण्याची गती इतकी वाढली आहे की आपल्याला अपेक्षित भौतिक सुविधा आणि मूल्यात्मक वाढ यांची पायाभरणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो का असा प्रश्न पडतो. पूर्वी आयुष्याच्या उत्तरार्धात कष्टाने कमावलेल्या पुंजीतून घर बांधले जाई. आता भौतिक गरजांच्या यादीतील गोष्टी पूर्ण नाही झाल्या तर आपण मागे पडलो अशी भावना तरुणाईच्या मनात येते. या धावत्या जगाशी जुळवून घेणे मानसिक दृष्ट्या थकवणारे आहे. म्हणूनच एकमेकांना समजून घेणे मानसिक आधार देणे वास्तवाचे भान आणून देणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेत यश म्हणजे सर्वस्व या मानसिकतेतून बाहेर पडणे आवश्यक आहे.

शून्य ते शिखर आणि शिखर ते शून्य

आपल्या गरजा काय आहेत?. आपल्याला नोकरी हवी असते. ती मिळाली, पुढे गाडी आली, पण पुढे काय? आपले भौतिक प्रश्न महत्त्वाचे आहेत. पण त्या पलीकडे एक सामाजिक अवकाश आहे. त्यात माझे योगदान काय हा प्रश्न पडणे हे शिखर आहे. कारण त्या स्थितीत आपण व्यक्तीकडून समाजाप्रती बांधिलकीकडे जातो. अनेकदा वरवरच्या शिखरावरून आपण वारंवार शून्यावर येत असतो. उदाहरणार्थ मी अमूक अधिकारी आहे, माझी गाडी का अडवली, असा अहंकार निर्माण होतो. म्हणजेच आपण पुन्हा शून्यावर येऊन आदळतो. आपण अधिकारी असताना वेगवेगळ्या पदांवर काम करत असतो. त्यावेळी लोकांसाठी कामे करत असतो. त्यात आपण काही वेळा यशस्वी होतो. शिखरावर पोचतो. समस्या सोडवण्यात अपयशी ठरलो की माध्यमांसाठी, लोकांसाठी टीकेचे धनी ठरतो आणि आपण शून्यावर जातो. त्यामुळे झालो आता आयएएस आणि शिखरापर्यंत पोहोचलो, असा भ्रम असतो.त्यातून बाहेर पडायला हवे.

प्रशासकीय आव्हाने खूप गुंतागुंतीची

मी अधिकारी झाल्यापासून गेल्या ११ वर्षात पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, अशा वेगवेगळ्या भागातील परिस्थिती अनुभवली. गेल्या २५ वर्षात सामाजिक, आर्थिक, तंत्रज्ञानात्मक बदल झाले आहेत. इतके बदल गेल्या शेकडो वर्षात झालेले नाहीत. हे बदल आत्मसात करण्याची क्षमता आहे का ,याचा विचार केला गेला पाहिजे… त्यासोबतच प्रशासकीय व्यवस्थेत हवामान बदल, शेती, सामाजिक तणाव, उद्याोग, स्त्रिया, कामगार, वंचित घटकांचे प्रश्न, शिक्षण अशा विविध विषयांत काम करणे अभिप्रेत असते. प्रशासन म्हणून मूलभूत बदलांची पायाभरणी करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यात एक सातत्य आणि संयमाची परीक्षा आहेच. काही मूलभूत बदल दिसण्यासाठी वेळ जावाच लागतो. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत आणि मिळणाऱ्या यशाच्या बाबतीतही हे लागू होते. आपल्या यशानंतरची प्रशासकीय आव्हाने खूप गुंतागुंतीची आहेत याचीही जाणीव असणे गरजेचे आहे.

प्लॅन बी तयार असणे गरजेचे

एक परीक्षा पास झालो म्हणून ठीक आहे. पण मराठी साहित्य आवडते म्हणून त्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे भविष्य नक्की काय आहे? याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळेच स्वत:चा प्लॅन बी तयार असणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारी दरम्यान आपल्याला अनेक प्रकारची कौशल्ये विकसित करता येतात. आपला इतिहास, तंत्रज्ञान, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, समाजशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखीय घटकांशी परिचय होतो. ही शिदोरी आपल्याला विविध क्षेत्रातील संधी आजमावण्यासाठी नक्की मदत करू शकेल. मुलींच्या बाबतीत स्पर्धा परीक्षांच्या एक दोन प्रयत्नातील अपयशानंतर घरच्यांकडून लग्न करण्याचा आग्रह दिसून येतो. अशावेळी पालकांनी मुलींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे.

Story img Loader