Maharashtra SSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. मंडळाने (MSBSHSE) पत्रकार परिषदेद्वारे सकाळी ११ वाजता हा निकाल जाहीर केला आहे. मात्र विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल पाहता येणार आहे. यंदा ९५.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता १२ वी प्रमाणेच कोकण विभागात सर्वाधिक ९९.०१ टक्के उत्तीर्ण होण्याची टक्केवारी नोंदवली गेली आहे. दुसरीकडे, ९४.७३ टक्के निकालासह नागपूर खाली आहे. मात्र या निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थी गुण वाढवण्यासाठी बोर्डाकडे अर्ज करु शकतात. यासाठी बोर्डानेही खास सुविधा दिली आहे. तसेच निकालानंतर पेपर पुर्नपासणीसाठी अर्ज करण्याची तारीख जाहीर केला आहे.
दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थी गुण वाढवण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत करु शकतात अर्ज
दहावीच्या परीक्षेत झालेल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी गुण वाढवण्यासाठी बोर्डाने विशेष सेवा दिली आहे, असे विद्यार्थी जे सर्व विषयात उत्तीर्ण आहेत परंतु त्यांना त्यांचे गुणवाढवायचे आहेत, ते ग्रेड-सुधारणा परीक्षेला बसू शकतात. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १० वी एसएससी ग्रेड सुधारणा परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 किंवा मार्च 2025 मध्ये होईल. पुनर्परीक्षा किंवा ग्रेड-सुधारणा परीक्षेसाठी अर्ज करण्याची सुविधा ३१ मे पासून सुरु होईल. विद्यार्थ्यांना शाळा किंवा विभागीय मंडळ कार्यालयातून याबाबत अतिरिक्त तपशील माहिती मिळू शकते.
निकालावर असमाधानी विद्यार्थी पेपर पुनर्तपासणीसाठी कधीपर्यंत देऊ शकतात?
महाराष्ट्र बोर्डाकडून इयत्ता १० च्या निकाल जाहीर झाल्यानंतर, त्या निकालावर समाधानी नसलेले विद्यार्थी त्यांच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन करू शकतात. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १० वीच्या निकालाचे पुनर्मूल्यांकन वैयक्तिकरित्या किंवा संबंधित शाळांद्वारे केले जाऊ शकते. महा एसएससी २०२४ च्या निकालाच्या पुनर्मूल्यांकनाची मुदत २८ मे ते ११ जून दरम्यान सुरु असेल.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी ‘या’ ६ स्टेप्स लक्षात ठेवा
DigiLocker वेबसाइटला भेट द्या- digilocker.gov.in आणि साइन अप करा.
तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा.
‘Education’ श्रेणी अंतर्गत, MSBSHSE निवडा
महाराष्ट्र एसएससी परीक्षा निकाल २०२४ वर क्लिक करा
आपले तपशील सबमिट करताच आपल्याला मार्कशीट दिसेल
पेज डाउनलोड करा किंवा प्रिंट काढा