Maharashtra Board SSC Result 2024 at mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे आज (२७ मे) इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर करणार आहे. सकाळी ११ वाजता उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी, दहावीचा विभाग व लिंगनिहाय निकाल असे तपशील पत्रकार परिषदेत जाहीर केले जातील तर एसएससी निकालाची लिंक दुपारी १ वाजता सक्रिय होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एसएससीचे विद्यार्थी त्यांचे इयत्ता 10वीचे निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात – mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in आणि results.digilocker.gov.in. results.targetpublications.org तसेच अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त, विद्यार्थी ऑफलाइन मोडमध्ये त्यांचा महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल पाहू शकतात. काहीवेळा वेबसाईटवर एरर येत असल्यानं विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासण्यात अडचणी येतात अशावेळी हे पर्यायी मार्ग आपला वेळ वाचवू शकतात.
दहावीच्या निकालाची गेल्या वर्षीची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९३. ८३ टक्के नोंदवली गेली होती, २०२२ च्या तुलनेत मागील वर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का ३.१८ ने घसरला होता. यंदा बारावीच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे, अशीच प्रगती दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबत सुद्धा दिसणार का हे आता काहीच तासात उघड होणार आहे.दहावीच्या निकालाबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स सहज मिळवण्यासाठी खालील माहिती आवर्जून वाचा.
दहावीच्या सर्व विद्यार्थी व पालकांना लोकसत्ता टीमकडून सुद्धा शुभेच्छा!
Maharashtra SSC Results 2024 Live Updates, 27 May 2024: दहावीचा निकाल काय लागला? सगळे अपडेट्स मिळवा एकाच क्लिकवर
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
दहावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लोकसत्ता टीमकडून खूप शुभेच्छा!
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक –
कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचा हा निर्णय घेताना विद्यार्थ्यांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागते.तर अशावेळी पालकांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा. तसेच कला (Arts) , विज्ञान (Science) , कॉमर्सपैकी (Commerce) अनुभवी व्यक्तींकडून, विद्यार्थ्यांकडून तर शिक्षकांकडून संबंधित विषयाची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.
दहावीचा निकाल लागला? कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचा हे कसं ठरवाल?
दहावी बोर्डाच्या परीक्षेनंतर योग्य स्ट्रीम निवडणे हा महत्वाचा निर्णय ठरतो. विद्यार्थ्यांनी त्यांना कोणत्या क्षेत्रात आवड आहे हे लक्षात घेऊन कला (Arts) , विज्ञान (Science) , कॉमर्सपैकी (Commerce) तुम्ही कोणत्या क्षेत्राध्ये सहज शिक्षण घेऊ शकता याचा अंदाज घ्या व त्यानुसार कॉलेज आणि क्षेत्र विचारपूर्वक निवडा.
तुमच्या गुणपत्रिकेतील ही माहिती तुम्ही तपासली का ?
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन गुणपत्रिका पाहिल्यावर सगळ्यात पहिला स्वतःचे नाव, रोल नंबर, जन्मतारीख, त्यांनी वेगवेगळ्या विषयात मिळवलेले गुण इत्यादींचा उल्लेख आहे का हे काळजीपूर्वक तपासून घ्यावे. कारण – ही गुणपत्रिका तुमच्या अकरावीची प्रवेश प्रक्रियेसाठी महत्वाची ठरणार आहे.
निकालाची गेल्या काही वर्षांतील टक्केवारी :
दहावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गेल्या काही वर्षांची टक्केवारी पाहू…
२०२४ – ९५.८१ टक्के
२०२३ – ९३.८३ टक्के
२०२२ – ९६.९४ टक्के
२०२१ – ९९.९५ टक्के
२०२०- ९५.३ टक्के
राज्यातील नऊ विभागीय मंडळाचा निकाल –
दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४९,३२६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,८४,४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८१ आहे.
नियमित, पुनर्परिक्षार्थी व खाजगी विद्यार्थांचे निकालाचे प्रगतीपुस्तक –
दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, पुनर्परिक्षार्थी व खाजगी मिळून एकूण १६,११,८१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६,००,०२१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी १५,१७,८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.८६ आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांनी सुद्धा मारली बाजी : चक्क 'एवढे' टक्के लागला निकाल
दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ९१४९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९०७८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी ८४६५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.२५ आहे.
खाजगी विद्यार्थ्यांची टक्केवारी –
परीक्षेला राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,८९४ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी २०,४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.४२ आहे.
दहावीचा निकाल वेबसाईट आणि मोबाईलवर कसा पाहायचा?
महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in यासह सर्व अधिकृत वेबसाइटवर दहावीचा निकाल तुम्ही थेट पाहू शकता.
महाराष्ट्र बोर्डाचा निकाल एसएमएसद्वारे कसा पहावा
१. तुमच्या मोबाइलमध्ये एसएमएसचं ॲप घ्या.
२. यामध्ये महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १०वी निकाल २०२४ साठी MHSSC सीट क्रमांक टाइप करा.
३. त्यानंतर ५७७६६ वर एसएमएस पाठवा.
बोर्डाच्या गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रती, पुनर्मुल्यांकनाचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध :
दहावीच्या ऑनलाइन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर (http://verification.mh-ssc.ac.in) विंडो उद्या २८ मे पासून ते ११ जूनपर्यंत विद्यार्थ्यांसाठी ओपन ठेवली जाईल. उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करू इच्छिणारे विद्यार्थी बोर्डाच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करू शकतात किंवा ते त्यांच्या शाळांद्वारे ऑफलाइन अर्ज करू शकता.
१०० टक्के गुण मिळवणारे ‘हुश्शार विद्यार्थी’ :
तब्ब्ल १८७ विद्यार्थ्यांना परीक्षेत १०० टक्के गुण मिळाले आहेत.१०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत लातूर विभागाने बाजी मारली आहे. महाराष्ट्रातील १०० टक्के निकाल लागलेल्या राज्यांची नावे आणि विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे :
पुणे: १०
नागपूर : १
छत्रपती संभाजीनगर : ३२
मुंबई : ८
कोल्हापूर: ३
अमरावती: ७
लातूर: १२३
कोकण : ३
पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांची निकाल –
परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,७७० पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३२७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १२,९५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ५१.१६ आहे.
दहावीच्या निकालात कोणत्या राज्याने मारली बाजी व कोणत्या राज्याचा निकाल लागला सगळ्यात कमी ?
यावर्षी नागपूरचा निकाल हा सर्वात कमी म्हणजे ९४. ७३ टक्के लागला आहे तर कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला आहे.
दहावीच्या निकालात कोणी मारली बाजी?
विद्यार्थी –
दहावीच्या परीक्षेसाठी ८,२७,४५० विद्यार्थ्यांची नोंदणी , त्यातील ८,२४,२६७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७,७६६३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि निकाल – ९४. ५६% टक्के लागला आहे.
विद्यार्थिनी –
दहावीच्या परीक्षेसाठी ७,३२,७०४ विद्यार्थिनींची नोंदणी, त्यातील ७,२८,०५९ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी ७,०७,८११ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत आणि निकाल ९७.२१% टक्के लागला आहे.
महाराष्ट्र एसएससी निकाल २०२४ : निकाल लागला, आता पुढे काय?
दहावीचा निकाल लागला असून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता कला, विज्ञान, बीकॉम या क्षेत्रांमध्ये त्यांच्या आवडीनुसार प्रवेश घेऊ शकतात.
10th Exam Result 2024: दहावीचा निकाल पाहण्यासाठी 'या' स्टेप्स करा फॉलो
१. निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
२. होमपेजवर दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचे नाव टाकून सबमिट करा.
३. स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल.
४. निकाल दिसल्यानंतर तो तपासा आणि पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा व संदर्भासाठी एक प्रिंटआउट सुद्धा घ्या.
दहावीचा निकाल लागला!
दहावीच्या निकालाची गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी वाट पाहत होते. तर तो निकाला अखेर आज लागला आहे. यंदा महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८१ टक्के इतकी आहे…
राज्यातील २३,२८८ माध्यमिक शाळांतून १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,३८२ शाळांचा निकाल १०० % लागला आहे
राज्यात दहावीच्या परीक्षांमध्ये तब्बल ७२ विषयांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या ज्यामध्ये १८ विषयांचा निकाल हा १०० टक्के लागलेला आहे.
महाराष्ट्र उच्च माध्यमिक मंडळाच्या जिल्हानिहाय निकलात सिंधुदुर्गाने बाजी मारली असून येथील उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.३५ इतकी आहे. तर तुलनेने जिल्ह्यात ९२.०२ टक्के इतका कमी निकाल लागला आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण – 99.01
कोल्हापूर – 97.45
पुणे – 96.44
मुंबई – 95.83
अमरावती – 95.58
नाशिक – 95.28
लातूर – 95.27
संभाजीनगर – 95.19
नागपुर – 94.73
Maharashtra Board Class 10th Results 2024 Announced यंदा राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.
१५८९- शास्त्रीय नृत्य
२९४० – शास्त्रीय गायन
११५१ – शास्त्रीय वादन
११,३१८- लोककला
७- नाट्य
१,२८,१९९- चित्रकला
३२,९६३- क्रीडा
२४- NCC
६७४० स्काऊट गाईड
महाराष्ट्र उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या निकालात राज्यातील नऊ विभागांमधून तब्बल १८७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. यापैकी सर्वाधीक १०० टक्के प्राप्त केलेले विद्यार्थी लातूरमधील आहेत. लातूर विभागात तब्बल १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के प्राप्त झाले आहेत.
दहावीच्या निकालात यंदा पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.२१ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५६ इतकी आहे. २.६५ टक्क्यांनी मुलींची बाजी मारली आहे.
महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालात कोकण विभागाने ९९.०१ टक्क्यांनी बाजी मारली आहे. तुलनेने यंदा नागपूरचा निकाल हा सर्वात कमी म्हणजे ९४. ७३ टक्के लागला आहे.
महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून पत्रकार परिषदेत दहावीच्या निकालाच्या वाचनाला सुरुवात झाली आहे. गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातून उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८१ टक्के इतकी आहे.
महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून पत्रकार परिषदेत दहावीच्या निकालाच्या वाचनाला सुरुवात झाली आहे. उत्तीर्णतेची टक्केवारी व राज्यातील शाळांची कामगिरी याविषयी तपशील करणार सादर
महाराष्ट्र एसएससी मध्ये दोन विषयात उत्तीर्ण ग्रेड मिळवण्यात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना ११ वी मध्ये तात्पुरत्या प्रवेशाची परवानगी दिली जाते. मात्र त्यांना इयत्ता १२ वी मध्ये प्रवेश घेण्याआधी या दोन्ही पेपरमध्ये उत्तीर्ण व्हावे लागेल.
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल काय लागला? सगळे अपडेट्स मिळवा एकाच क्लिकवर