Maharashtra Board HSC Result 2024 check Updates at mahresult.nic.in, mahahsscboard.in, hscresult.mkcl.org: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार या प्रश्नावर काल २० मे रोजी बोर्डाकडून ठोस उत्तर देण्यात आलं. आज म्हणजेच मंगळवार, २१ मे २०२४ हा दिवस बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील १५.१३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. गेल्यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला होता.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितल्यानुसार विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. तसेच निकालाची प्रिंट घेता येणार आहे. बारावीच्या निकालाचे क्षणोक्षणीचे लाईव्ह अपडेट्स आम्ही आपल्याला देणार आहोत. त्यामुळे निश्चिन्त व्हा, व निकाल पाहण्यासाठी सज्ज व्हा.

Live Updates

Maharashtra HSC Results 2024 Live Updates, 21 May 2024: बारावीच्या निकालाचे क्षणोक्षणीचे लाईव्ह अपडेट्स, इथे पाहा

15:19 (IST) 21 May 2024
महाराष्ट्र HSC निकाल 2024 लाइव्ह अपडेट्स: बारावीचा निकाल लागला आता पुढे काय?

महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता 12वीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता निकाल डाउनलोड करण्यासाठी mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahahsscboard.in आणि results.digilocker.gov.in ऑनलाइन लिंक्स सक्रिय केल्या आहेत. उत्तीर्ण विद्यार्थी आता त्यांच्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमधून निकालाची प्रत मिळवू शकतात व पुढील पदवीच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात.

14:15 (IST) 21 May 2024
HSC Results 2024: बारावीच्या निकालात २ टक्के वाढ; पाहा गतवर्षातील टक्क्यांची आकडेवारी

गेल्या काही वर्षांमधील बारावीच्या निकालातील उत्तीर्णतेची टक्केवारी

2024: 91.87 टक्के (एकूण), 93.37 टक्के (फक्त नवीन विद्यार्थी)

2023: 91.25 टक्के

2022: 94.22 टक्के

2021: 99.63 टक्के

2020: 90.66 टक्के

14:07 (IST) 21 May 2024
Maharashtra HSC 12th Result 2024 Live: मार्कशीटमध्ये फक्त टक्के नाही आधी 'हे' तपशील तपासा

mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahahsscboard.in किंवा results.digilocker.gov.in वरून महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वी बारावीच्या निकालाची मार्कशीट डाउनलोड केल्यानंतर, विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती चुकीची आहे का ते तपासावे लागेल. विद्यार्थ्यांनी आपले नाव, वर्ग, पालकांचे नाव, विषय तपासावे. त्यात काही चूक आढळून आल्यास विद्यार्थ्यांनी तत्काळ मंडळाशी संपर्क साधावा.

12:47 (IST) 21 May 2024
१ वाजताच 'या' ४ वेबसाईटवर पाहता येणार बारावीचा निकाल; १५ लाख विद्यार्थ्यांनो अजून १० मिनिटांची प्रतीक्षा करा

Maharashtra HSC 12th result 2024 Live: Official websites to check Maharashtra HSC result

- mahresult.nic.in

- hscresult.mkcl.org

- mahahsscboard.in

- results.digilocker.gov.in

12:31 (IST) 21 May 2024
HSC Results Declared Live: १५४ पैकी २६ विषयांमध्ये १०० टक्के निकाल, पाहा तपशील

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा १५४ पैकी २६ विषयांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. राज्यात विज्ञान शाखेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू अशा भाषांमध्ये परीक्षा पार पडल्या होत्या तर कला व वाणिज्य शाखेच्या परीक्षांमध्ये कन्नड व गुजरातीतुन परीक्षा देण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध होता.

11:52 (IST) 21 May 2024
Maharashtra HSC Results 2024: राज्यात एकमेव विद्यार्थिनीला १०० टक्के गुण...

छत्रपती संभाजीनगर विभागातील एका विद्यार्थिनीला १०० टक्के गुण मिळाले आहेत.

सविस्तर वाचा...

11:33 (IST) 21 May 2024
Maharashtra HSC Results 2024: शाखानिहाय निकाल

कला - ८५.८८ टक्के

वाणिज्य - ९२.१८

विज्ञान - ९७. ८२ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम - ८७.७५ टक्के

आयटीआय - ८७.६९ टक्के

11:27 (IST) 21 May 2024
Maharashtra 12th HSC Results 2024 Declared: बारावीचा निकाल जाहीर… मुलींनी मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

सविस्तर वाचा...

11:26 (IST) 21 May 2024
Maharashtra HSC Results 2024: विभागीय मंडळनिहाय निकाल

कोकण - ९७.५१

पुणे - ९४.४४

नागपूर - ९२.१२

छत्रपती संभाजीनगर - ९४.०८

मुंबई - ९१.९५

कोल्हापूर - ९४.२४

अमरावती - ९३.००

नाशिक - ९४.७१

लातूर - ९३.३६

11:26 (IST) 21 May 2024
HSC Results 2024: बारावीच्या निकालात यंदा मुलींनी पुन्हा बाजी मारली! पाहा टक्केवारी

यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ९२.६० टक्के मुलं, तर ९५.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

11:24 (IST) 21 May 2024
Maharashtra HSC Results 2024: गेल्या पाच वर्षांचा निकाल

2023 - 91.25 टक्के

2022 - 94.22 टक्के

2021 - 99.63 टक्के

2020 - 90.66 टक्के

2019 - 85.88 टक्के

11:24 (IST) 21 May 2024
Maharashtra HSC Board Results 2024: कोकणाची बाजी, मुंबईमध्ये नाराजी, बारावीच्या निकालात कुणी केलं टॉप?

यंदा कोकण विभागाचा बारावीचा निकाल ९७.५१ टक्के लागला आहे तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९१. ९५ टक्के इतका लागला आहे.

11:14 (IST) 21 May 2024
HSC Results Live Updates: बारावीचा निकाल 93.37 टक्के!

बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १५, २०, १८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५,०९, ८४८ विद्याथी परीक्षेला उपस्थित होते. यातील १३, ८७,१२५ विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत. बारावीचा यंदाचा सरासरी निकाल हा 93.37 टक्के लागला आहे.

11:14 (IST) 21 May 2024
Maharashtra HSC Results 2024: यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे.

11:07 (IST) 21 May 2024
Maharashtra HSC Results 2024: बारावीचा निकाल लवकर जाहीर कसा झाला?

महाराष्ट्र बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलेल्या माहितीनुसार यंदा, प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण प्रथमच ऑनलाईन पोर्टल वरून घेतल्याने निकाल लवकर जाहीर करण्यात मदत झाली.

10:53 (IST) 21 May 2024
HSC Result 2024: बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद काही मिनिटांत होईल सुरु

Maharashtra HSC 2024 Results Update: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी बोर्डाकडून आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेतली जाईल. तर मार्कशीट डाउनलोड करण्याची लिंक दुपारी १ वाजल्यापासून लाईव्ह केली जाईल. mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahahsscboard.in आणि results.digilocker.gov.in या वेबसाइट्स वर बारावीचा निकाल पाहता येईल.

10:29 (IST) 21 May 2024
HSC Result 2024: बारावीचा निकाल पाहण्यासाठी पर्यायी वेबसाइट

mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि mahahsscboard.in वेबसाइट्स व्यतिरिक्त, महाराष्ट्र बोर्डाचा एचएससी २०२४ चा निकाल results.digilocker.gov.in वर देखील उपलब्ध असेल.

10:17 (IST) 21 May 2024
Maharashtra Board 12th HSC Result : बारावीच्या निकालात गतवर्षी ७००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मिळवले ९० टक्क्यांहून अधिक गुण, यंदाची किती असेल संख्या?

गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या बारावीच्या निकालात तब्बल ७,६९६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते.

09:55 (IST) 21 May 2024
Maharashtra Board HSC 12th Result Live:बारावीच्या निकालात टक्क्यानुसार श्रेणी कशी मोजली जाईल?

75% आणि वरील: Distinction

60% आणि त्याहून अधिक: फर्स्ट क्लास

45% ते 59%: सेकंड विभाग

35% ते 44%: उत्तीर्ण

35% च्या खाली: नापास

09:36 (IST) 21 May 2024
विज्ञान, कला व कॉमर्समध्ये यंदा कोणत्या शाखेतून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
  • विज्ञान शाखेतील बारावीचे विद्यार्थी: ७ लाख ६० हजार ४६
  • वाणिज्य (कॉमर्स) शाखेतील बारावीचे परीक्षा दिलेले विद्यार्थी: ३ लाख २९ हजार ९०५
  • कला शाखेतील बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या: ३ लाख ८१ हजार ९८२
  • यंदा विज्ञान शाखेतून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. तिन्हीपैकी कोणत्या शाखेचे विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवणार हे आता १ वाजता समजेल

    09:16 (IST) 21 May 2024
    Maharashtra Board HSC 12th Result Live: बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलीच मारणार का बाजी?

    MSBSHSE द्वारे शेअर केलेल्या माहितीनुसार, यावर्षी राज्यात एकूण १५,१३,९०९ विद्यार्थ्यांनी HSC परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात ८ लाख २१ हजार ४५० मुले आणि ६ लाख ९२ हजार ४२४ मुलींचा समावेश आहे

    09:00 (IST) 21 May 2024
    १२ वी च्या विद्यार्थ्यांना निकालाची मूळ प्रत कधी मिळणार?

    गेल्या वर्षी, १२ वीचा निकाल २५ मे रोजी जाहीर झाल्यावर ५ जूननंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये निकालाची प्रत उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे यंदा सुद्धा निकालाच्या तारखेनंतर साधारण १० दिवसात विद्यार्थी त्यांच्या संबंधित कॉलेजमध्ये भेट देऊन निकालाची प्रत मिळण्याबाबत चौकशी करू शकतात

    08:49 (IST) 21 May 2024
    बारावीच्या निकालानंतर ATKT परीक्षा कुणाला व कधी द्यावी लागेल?

    गेल्या वर्षी तब्बल ३३,३०६ विद्यार्थ्यांना ATKT परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली होती. ही परीक्षा दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात तात्पुरते प्रवेश घेण्याची परवानगी देते मात्र पुढे जाण्याआधी त्यांना हे विषय उत्तीर्ण व्हावे लागतात. साधारण ऑक्टोबरमध्ये एटीकेटीच्या परीक्षा होतात.

    08:38 (IST) 21 May 2024
    बारावीच्या परीक्षेत नापास होण्याचे फक्त एकच असू शकते कारण!

    महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या निकषांमध्ये एकच नियम आहे तो म्हणजे थेअरी व प्रात्यक्षिक परीक्षा मिळून विद्यार्थ्याने ३५ टक्के गुण मिळवलेले असायला हवेत.

    08:33 (IST) 21 May 2024
    बारावीचा निकाल Digilocker वर पाहण्यासाठी सोप्या स्टेप्स

    डिजीलॉकरवर कसा पाहाल निकाल?

  • सर्वप्रथम, तुमच्या मोबाईल फोनवर किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसवर DigiLocker ऍप्लिकेशन उघडा.
  • आता, तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. आवश्यक असल्यास, तुमच्या प्रोफाइल पेजवर आधार क्रमांक सिंक प्रक्रिया पूर्ण करा.
  • डाव्या साइडबारवर, ‘पुल पार्टनर डॉक्युमेंट्स’ असे लिहिलेल्या पर्यायावर क्लिक करा.
  • ड्रॉपडाउन मेनूमधून ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ’ निवडा.
  • तुम्हाला हवा असलेला प्रकार निवडा, जसे की SSC मार्कशीट, स्थलांतर किंवा उत्तीर्णता प्रमाणपत्र.
  • उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि तुमचा रोल नंबर प्रविष्ट करा.
  • तपशील सबमिट करा आणि मार्कशीट स्क्रीनवर दिसेल.
  • डाउनलोड करा व प्रिंटआउट घ्या.
  • 08:19 (IST) 21 May 2024
    बारावीचा निकाल सगळ्यात आधी पाहण्यासाठी 'ही' लिंक बेस्ट

    एकाच वेळी मोठ्या संख्येत विद्यार्थी या साईटवर लॉग इन करत असल्याने साईट क्रॅश होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून डिजीलॉकर वर बारावीचे मार्क तपासून पाहू शकता.

    डिजिलॉकर वेबसाईट: digilocker.gov.in

    08:10 (IST) 21 May 2024
    mahresult.nic.in वर बारावीचा रिझल्ट पाहण्यासाठी महत्त्वाचे तपशील

    बारावीचा निकाल पाहण्यासाठी आवश्यक तपशील

  • रोल नंबर/ हॉलतिकीट क्रमांक
  • आईचे पहिले नाव
  • 07:54 (IST) 21 May 2024
    mahresult.nic.in वर कसा पाहाल निकाल?

    निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

    १. प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.२. यानंतर होमपेजवरील Maharashtra SSC and HSC result साठी लिंकवर क्लिक करा.३. आता तुमचा सीट नंबरआणि जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.४. यानंतर Maharashtra board 10th and 12th results 2024 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.५. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

    07:49 (IST) 21 May 2024
    महाराष्ट्र बोर्डाने १२ वीचा निकाल जाहीर करताच इथे तपासा गुण, पाहा Direct Links

    महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेच्या निकालाच्या अधिकृत वेबसाईट (HSC Results Direct Link)

  • hscresult.mahahsscboard.in
  • mahahsscboard.in
  • maharesult.nic.in
  • Maharashtra HSC Results 2024 Live Updates, 21 May 2024

    Maharashtra Board 12th HSC Result 2024 Live Updates in Marathi

    Story img Loader