HSC Student Essential Documents List: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी २१ मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे.परंतु प्रवेशप्रक्रिया पूर्ण करताना अनेक विद्यार्थी संभ्रमात येतात. कधीकधी महत्त्वाची कागदपत्र राहून जातात, तर कधी काही महत्त्वाची माहिती भरणं राहून जातं. पण अशावेळी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे घाबरुन न जाता किंवा संभ्रम निर्माण न करता प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. नाहीतर ऐनवेळी हे दाखले घेण्यासाठी दलालांच्या माध्यमातून तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे हेलपाटे मारावे लागतात. हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी वेळेतच विविध शैक्षणिक दाखले काढणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी काही महत्त्वाची कागदपत्र तयार ठेवली तर विद्यार्थ्यांना कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. चला तर मग पाहुयात कोणती महत्त्वाचीकागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहेत.
Other Courses : इतर अभ्यासक्रमासाठी ही कागदपत्र आवश्यक
१. जात प्रमाणपत्र
२. जात वैधता प्रमाणपत्र
३. नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र
४. डोमिसाइल प्रमाणपत्र
५. दिव्यांगता प्रमाणपत्र
६. आधार क्रमांक
७. राष्ट्रीयकृत बँक खाते
८. सैन्यदल वर्गाचे प्रमाणपत्र (या कोट्यातून प्रवेश घ्यायचे असल्यास)
९. अल्पसंख्याक वर्गाचे प्रमाणपत्र (या कोट्यातून प्रवेश घ्यायचे असल्यास)
मागासवर्गीयांसाठी ही कागदत्र आवश्यक
१. जात प्रमापत्र (Caste Certificate)
२. जातवैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
३. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Criminal Certificate)
मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
१. नीट आँनलाईन फाँर्म प्रिंट
२. नीटप्रवेश पत्र
३. नीट मार्क लिस्ट
४. १०वी चा मार्क मेमो
५. १०वी सनद
६. १२वी मार्क मेमो
७. नँशनँलीटी सर्टीफिकेट
८. रहिवाशी प्रमाणपत्र
९. १२ वी टी सी
१०. मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
११. आधार कार्ड
१२. उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
१३. मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
१४. मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड
इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
१. MHT-CET आँनलाईन फाँर्म प्रिंट
२. MHT-CET पत्र
३. MHT-CET मार्क लिस्ट
४. १० वी चा मार्क मेमो
५. १०वी सनद
६. १२वी मार्क मेमो
७. नँशनँलीटी सर्टीफिकेट
८. रहिवाशी प्रमाणपत्र
९. १२ वी टी सी
१०. आधार कार्ड
११. उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
१२. राष्ट्रीय बँकेतील खाते
१३. फोटो.
हेही वाचा >> Maharashtra Board 12th Results 2024: ठरलं! १२ वीचा निकाल उद्या! मूळ गुणपत्रिका कधी मिळणार?
निकालाचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा
https://education.indianexpress.com/embed/board-result?exam-slug=maharashtra-hsc-12
अर्ज भरताना कोणती काळजी घ्याल?
विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यसाठी अनेक अर्ज भरावे लागतात. हे अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी गोंधळून जाणे टाळावे. अन्यथा अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून काही चूका होऊ शकतात. परंतु त्या चुका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक ती काळजी घेतल्यास चुका होणार नाहीत.
१. अर्ज भरताना तुमची गुणपत्रिका, जातीचा दाखला, आधार कार्ड यांसारख्या आवश्यक कागदपत्रांची कॉपी कायम सोबत ठेवा, जेणेकरुन अर्ज भरताना माहिती भरण्यास सोपे जाईल. तसेच तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो देखील तयार ठेवावे.
२. जर तुम्ही ऑफलाइन अर्ज भरत असाल तर तुमच्या अर्जासोबत कागपत्र जोडण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी म्हणजेच स्टॅपलर, गम यांसारख्या गोष्टी देखील सोबत ठेवा. तसेच अर्जात दिलेल्या प्रमाणेच प्राथमिक माहिती जसे की, विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, नागरिकत्व, जन्मतारिख यांसारखी महत्त्वाची माहिती अचूक भरावी.