HSC Student Essential Documents List: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी २१ मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे.परंतु प्रवेशप्रक्रिया पूर्ण करताना अनेक विद्यार्थी संभ्रमात येतात. कधीकधी महत्त्वाची कागदपत्र राहून जातात, तर कधी काही महत्त्वाची माहिती भरणं राहून जातं. पण अशावेळी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे घाबरुन न जाता किंवा संभ्रम निर्माण न करता प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. नाहीतर ऐनवेळी हे दाखले घेण्यासाठी दलालांच्या माध्यमातून तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे हेलपाटे मारावे लागतात. हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी वेळेतच विविध शैक्षणिक दाखले काढणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी काही महत्त्वाची कागदपत्र तयार ठेवली तर विद्यार्थ्यांना कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. चला तर मग पाहुयात कोणती महत्त्वाचीकागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा