MSBSHSE Class 12th Results 2024 Date Time Declared:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. महाराष्ट्र शिक्षण मंडळामार्फत २ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत १२ वी बोर्डाच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते, याच परीक्षांचा निकाल विद्यार्थी शिक्षण मंडळाच्या https://mahresult.nic.in/ अधिकृत वेबसाइट किंवा अन्य वेबसाइटवरून पाहू शकता. पण, निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाचे तपशील विचारले जातात, जे भरल्यानंतर निकाल पाहता येतो. हेच महत्त्वाचे तपशील नेमके कोणते आहेत, जाणून घेऊ…

हे ही वाचा<< Maharashtra Board 12th HSC Result 2024 Live: धडधड वाढली! बारावीच्या निकालासाठी काहीच तास शिल्लक, बोर्डाकडून आतापर्यंत दिलेल्या सूचना वाचा

horiba India Hydrogen vehicle
चाकणमध्ये हायड्रोजन वाहन इंजिन चाचणी सुविधा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !

बारावीचा निकाल कसा पाहायचा?

१२ वीचा निकाल पाहण्याचे तीन पर्याय

१) MSBSHSE ने आपल्या अधिकृत नोटीसमध्ये काही वेबसाइट्सचा उल्लेख केला आहे, ज्यावर HSC 2024 चा निकाल उपलब्ध असेल. विद्यार्थी या वेबसाइट्सना भेट देऊ शकतात आणि सर्व माहिती भरून त्यांचा निकाल पाहू शकतात.

२) विद्यार्थी एसएमएस सेवेचाही वापर करून निकाल पाहू शकतील.

३) इयत्ता १२ वीचा निकाल डिजिलॉकरवरदेखील उपलब्ध असेल, जो विद्यार्थी ॲपमध्ये लॉग इन करून डाउनलोड करू शकतात.

१२ वीचा निकाल पाहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट, डिजिलॉकर आणि एसएमएस सेवेद्वारे पाहू शकतात. पण, तो तपासण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचे १२ वीचे प्रवेशपत्र तुमच्याजवळ ठेवणे आवश्यक आहे .

इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तो विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहायचा असेल तर महाराष्ट्र HSC बोर्डचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करावे लागते, त्यानंतरच स्क्रीनवर तुम्हाला निकाल दिसेल.

काही वेबसाइट्सवर तुम्हाला रोल नंबरसह शाळेचा कोड आणि इतर माहिती विचारली जाते. ही माहिती भरून सबमिट केल्यानंतरच तुम्हाला निकाल पाहता येतो.

बारावीचा निकाल कुठे पाहता येणार?  (HSC Results Direct Link)

१) https://mahresult.nic.in/

२) http://hscresult.mkcl.org

३) http://www.mahahsscboard.in

४) https://results.digilocker.gov.in

५) http://results.targetpublications.org

१२ वीचा ऑनलाइन निकाल कसा पहाल?

१) https://mahresult.nic.in/ या किंवा वर दिलेल्यापैकी बोर्डाच्या कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२) अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल.
३) त्यानंतर HSC Examination Result वर क्लिक करा.
४) आता तुम्हाला एका नव्या विंडोवर रिडीरेकट केलं जाईल, तिथे तुम्हाला रोल नंबर आणि आईचं नाव टाईप करावं लागेल.
५) त्यापुढे View Result वर क्लिक करा.
६) निकाल तुमच्या स्क्रिनवर असेल.

Story img Loader