Maharashtra Board HSC Result 2025 Date Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) बारावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षांच्या निकालाचं काम सध्या अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आता आपल्या उत्तरपत्रिकांचे नेमके कसे मूल्यांकन होणार आणि तो निकाल कधी जाहीर होणार याबाबत धाकधूक आहे. पण, आता निकालाची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण- बारावीच्या बोर्डाचा निकाल कधी लागणार? याबाबतची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. मात्र, नेमक्या कोणत्या तारखेला निकाल लागणार आहे, याबाबतचे अधिकृत परिपत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. येत्या आठवडाभरात परिपत्रक जाहीर होत निकालाची अधिकृत तारीख समोर येईल.

या वर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या; तर प्रात्यक्षिक परीक्षा त्यापूर्वी २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान घेण्यात आल्या होत्या. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे ८.१ लाख विद्यार्थी, ६.९ लाख विद्यार्थिनी आणि ३७ ट्रान्सजेंडर विद्यार्थी आहेत. परीक्षा ऑफलाइन घेण्यात आल्या होत्या आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित पेपर्ससाठी प्रवेशपत्रेही देण्यात आली होती.

बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेडदेखील मिळतील. ग्रेडिंग सिस्टीमनुसार ७५ टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार आहे. तर ६० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी मिळेल. तसेच ४५ टक्के ते ५९ टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी मिळेल. उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना ३५ पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना किमान गुणही मिळू शकले नाहीत, त्यांना पुन्हा पुरवणी परीक्षेला बसावे लागेल.

बारावीचा निकाल ऑनलाइन पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स (List of Websites to Check Maharashtra Board HSC Result 2025)

१) mahahsscboard.in
२) hsc.mahresults.org.in
३) hscresult.mkcl.org
४) msbshse.co.in
५) mh-ssc.ac.in
६) sscboardpune.in
७) sscresult.mkcl.org
८) mahresult.nic.in

महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२५ अधिकृतपणे जाहीर झाल्यावर तो कसा तपासायचा? (How to check Maharashtra HSC Result 2025)

एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी खालील पद्धतींनी त्यांचा अधिकृत निकाल तपासू शकतात.

ऑनलाइन पद्धत

१) महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत mahahsscboard.in या वेबसाइटवर जा.
२) HSC result link या लिंकवर क्लिक करा.
३) आता तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव एंटर करा.
४) सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर View Result वर क्लिक करा.
५) आता गुणपत्रिका डाऊनलोड करा आणि ती सेव्ह करा.

SMS द्वारे निकाल पाहण्याची प्रक्रिया काय? (Steps to Get Maharashtra Board CLass 12 2025 Result via SMS)

MHSSC असे टाईप करा आणि 5776 या क्रमांकावर SMS पाठवा

डिजीलॉकरद्वारे निकाल पाहण्याची पद्धत ( (How to check HSC Board Result 2024 In Digilocker )

डिजीलॉकरमध्ये लॉग इन करा .
महाराष्ट्र बोर्ड विभाग निवडा.
गुणपत्रिका पाहण्यासाठी सीट क्रमांक प्रविष्ट करा.