Maharashtra Board Result Date 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12वी) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (१०वी ) चे निकाल जाहीर करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवरून महाराष्ट्र बोर्ड निकाल मधील आपली गुणपत्रिका तपासू व डाउनलोड करू शकतात. प्राप्त माहितीनुसार, मे २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी mahresult.nic.in: mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे रोल नंबर प्रविष्ट करून त्यांचे गुण पाहू शकतील.

महाराष्ट्र दहावी बोर्डाचा निकाल साधारण कधी लागतो?

यापूर्वीच्या वर्षांमधील अंदाज पहिल्यास दहावी बोर्डाचा निकाल साधारण जून महिन्यात लागतो, पाहा गतवर्षीच्या तारखा..

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
Akola Assembly Election 2024, Caste Equation in Akola Vidhan Sabha Constituencies,
Akola Assembly Election 2024 : अकोला जिल्ह्यात चुरशीच्या लढती, जातीय समीकरणे कळीचा मुद्दा; मतांचे गणित जुळवण्यासाठी उमेदवारांची धडपड
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात
Raj Thackeray
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: “शाहरूख-सलमानचे चित्रपट शुक्रवारी पडले तरी…”, राज ठाकरेंची गुहागरमध्ये टोलेबाजी!
indian-constituation
संविधानभान: जातनिहाय जनगणनेची आवश्यकता
वर्ष तारीख
२०२३ २ जून
२०२२१७ जून
२०२११६ जून
२०२०२९ जून
२०१९८ जून

महाराष्ट्र बारावी बोर्डाचा निकाल साधारण कधी लागतो?

यापूर्वीच्या वर्षांमधील अंदाज पहिल्यास बारावी बोर्डाचा निकाल साधारण मे महिन्यात लागतो. करोना दरम्यान निकालाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या पण यंदा नियोजित वेळेत निकाल येण्याची अपेक्षित आहे. पाहा गतवर्षीच्या तारखा..

वर्ष तारीख
२०२३ २५ मे
२०२२७ जून
२०२१३ ऑगस्ट
२०२०१६ जुलै
२०१९८ मे 

निकालाचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल कसा तपासायचा?

स्टेप 1: mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
स्टेप 2: मुख्यपृष्ठावर, महाराष्ट्र SSC, HSC निकाल 2024 साठी लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: तुम्हाला नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल, रोल नंबर आणि आईचे नाव यासारखी आवश्यक माहिती भरून ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
स्टेप 4: महाराष्ट्र बोर्ड 10वी, 12वी चा निकाल 2024 स्क्रीनवर दाखवला जाईल.
स्टेप 5: भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करा किंवा प्रिंटआउट घ्या

महाराष्ट्र बोर्डासाठी उत्तीर्ण होण्याचे निकष काय आहेत?

महाराष्ट्र बोर्डासाठी इयत्ता १० वी (SSC) आणि इयत्ता १२ वी (HSC) या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचे निकष सारखेच आहेत. विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयात किमान ३५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. यामध्ये सर्व विषयांसाठी – मुख्य आणि पर्यायी अशा दोन्ही थिअरी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षांचा समावेश आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या १० वीच्या (SSC) परीक्षेतील गुणांची आकडेवारी (२०२३)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२३ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेत २०२३ मध्ये ९३. ८३ टक्के म्हणजेच. एकूण १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांमध्ये १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यामध्ये तब्बल १५१ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले होते. लातूर, औरंगाबाद, कोकण, मुंबई, पुणे अमरावती, येथील विद्यार्थ्यांचा १०० टक्के गुण मिळवणाऱ्या यादीत समावेश होता.

महाराष्ट्र बोर्डाच्या १२ वीच्या (HSC) परीक्षेतील गुणांची आकडेवारी (२०२३)

२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या (HSC) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालाची एकूण उत्तीर्ण टक्केवारी ९१.२५ टक्के होती. यात ९४.७३ टक्के वाटा विद्यार्थिनी व ८९. १४ टक्के वाटा हा विद्यार्थी (मुलांचा) होता.

Maharashtra HSC SSC Results 2024: १०वी, १२वीचा निकाल लवकरच; तुमची डिजिटल मार्कशीट कशी डाऊनलोड कराल? जाणून घ्या

दरम्यान, मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेला तब्बल २६ लाख विद्यार्थी उपस्थित होते आणि आता काहीच दिवसांत या २६ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणारा निकाल जाहीर होणार आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सुरू असून, नेमकी तारीख आणि वेळेची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.