Maharashtra Board HSC 12th Result Marksheet Download:महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र बोर्डाचा १२ वी २०२४ चा निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी त्यांचा निकाल तपासू शकतील. मात्र त्याआधी आपला निकाल डाऊनलोड कसा करायचा हे जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही महाराष्ट्र बोर्ड १२वी २०२४चा निकाल याप्रमाणे डाउनलोड करू शकता

१. सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्ड १२वी २०२४ निकाल या लिंकवर क्लिक करा.
२. वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा.
३. महाराष्ट्र बोर्ड १२वी २०२४चा निकाल तुम्हाला दिसेल.
४. महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी २०२४ च्या निकालाची प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

महाराष्ट्र एचएससी एसएससी निकाल 2024: डिजीलॉकरवरून महाराष्ट्र १०वी १२वीचा निकाल कसा डाउनलोड करायचा?

१. युजरनेम आणि पासवर्ड वापरून डिजिलॉकर ॲपवर लॉग इन करा
२. ‘प्रोफाइल’ पेजवर जा आणि आधार क्रमांक सिंक करा. डिजीलॉकर खाते आधीपासून आधार क्रमांक वापरून तयार केले असल्यास, पुन्हा करण्याची गरज नाही.
३. डाव्या साइडबारमधील ‘पुल पार्टनर डॉक्युमेंट्स’ बटणावर क्लिक करा.
४. पुढील स्क्रीनवर दोन ड्रॉपडाउन असतील.
५. पहिल्या ड्रॉपडाउनमध्ये, ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ’ निवडा.
६. पुढील ड्रॉप-डाउनमध्ये, मार्कशीट निवडा म्हणजे HSC/ SSC मार्कशीट/ स्थलांतर किंवा उत्तीर्ण इ.
७. पुढील स्क्रीनमध्ये महाराष्ट्र एसएससी ॲडमिट कार्ड/महाराष्ट्र एचएससी ॲडमिट कार्डवर नमूद केल्याप्रमाणे उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि रोल नंबर यासारखे आवश्यक तपशील भरा.
८. ‘Get Document’ वर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र HSC/Maharashtra SSC डिजिटल मार्कशीट/प्रमाणपत्र डाउनलोड होईल.
९. ही कागदपत्रे डिजीलॉकर खात्यात सेव्ह करण्यासाठी सेव्ह टू लॉकर बटणावर क्लिक करा.

हेही वाचा >> Maharashtra Board 12th HSC Result 2024 Live: धडधड वाढली! बारावीच्या निकालासाठी काहीच तास शिल्लक, बोर्डाकडून आतापर्यंत दिलेल्या सूचना वाचा

निकालाचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा

https://education.indianexpress.com/embed/board-result?exam-slug=maharashtra-hsc-12

१२ वीचा ऑनलाइन निकाल कसा पहाल?

१) https://mahresult.nic.in/ या किंवा वर दिलेल्यापैकी बोर्डाच्या कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२) अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल.
३) त्यानंतर HSC Examination Result वर क्लिक करा.
४) आता तुम्हाला एका नव्या विंडोवर रिडीरेकट केलं जाईल, तिथे तुम्हाला रोल नंबर आणि आईचं नाव टाईप करावं लागेल.
५) त्यापुढे View Result वर क्लिक करा.
६) निकाल तुमच्या स्क्रिनवर असेल.

उत्तीर्ण होण्यासाठी ही टक्केवारी आवश्यक आहे

महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात ३५ आणि एकूण ३५ टक्के गुण आवश्यक आहेत. यापेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी नापास मानले जातील. तथापि, बोर्ड एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी एक अतिरिक्त संधी देईल. असे विद्यार्थी कंपार्टमेंट परीक्षा देऊ शकतील. कंपार्टमेंट परीक्षेचे वेळापत्रक निकालानंतर जाहीर केले जाईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra board hsc 12th result 2024 marksheet download link at mahresult nicin mahahsscboardin hscresultmkclorg maharashtraeducationcom know steps to download online srk