Maharashtra Board Results 2024 Declared: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १५, २०, १८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५,०९, ८४८ विद्याथी परीक्षेला उपस्थित होते. यातील १३, ८७,१२५ विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत. यंदा बारावीचा निकाल ९३. ३७ टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे.

बारावीची परीक्षा ही तब्बल ९ विभागांमध्ये झाली होती.मागील वर्षी सुद्धा कमी अधिक प्रमाणात याचपद्धतीने विभागांची उत्तीर्णतेची टक्केवारी होती. यंदा सुद्धा कोकण विभागला आपला पहिला क्रमांक राखून ठेवण्यात यश आलं आहे. तर मुंबई विभागाला अजूनही शेवटच्या स्थानावरून पुढे जाता आलेले नाही.९७.५१ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर ९१.९५ टक्क्यांसह मुंबई विभाग सर्वात तळाशी आहे.

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
sanjay raut on dhananjay mahadik ladki bahin statement
“…म्हणून महिलांना धमक्या दिल्या जात आहेत”; धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!
khamgaon buldhana assembly constituency
खामगावात आकाश फुंडकर – दिलीप सानंद यांच्यात चुरशीची लढत; गटबाजी, मतविभाजन निर्णायक

बारावीचा निकाल: विभागीय मंडळनिहाय टक्केवारी

  • कोकण – ९७.५१
  • नाशिक – ९४.७१
  • पुणे – ९४.४४
  • कोल्हापूर – ९४.२४
  • छत्रपती संभाजीनगर – ९४.०८
  • लातूर – ९३.३६
  • अमरावती – ९३.००
  • नागपूर – ९२.१२
  • मुंबई – ९१.९५

तर यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी ९१.६० टक्के आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील एका विद्यार्थिनीला बारावीच्या परीक्षेत ५८२ आणि क्रीडा गुण १८ असे एकूण ६०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत.

हे ही वाचा<< Maharashtra Board 12th HSC Result 2024 Live: बारावीत विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा निकाल सर्वाधिक; कला शाखेत उत्तीर्णतेचा टक्का कमीच

निकालाचे अपडेट्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा

शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार विद्यार्थी, पालकांना दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल. विद्यार्थ्यांना mahahsscboard.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.

बारावीचा निकाल: सोप्या स्टेप्स फॉलो करा अन् पाहा गुण

  • सर्वप्रथम mahresult.nic.in एमएएच निकालाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • यानंतर होमपेजवरील Maharashtra HSC result साठी लिंकवर क्लिक करा.
  • पुढे हॉलतिकीटवरचा क्रमांक आणि आईचे नाव टाकून सबमिट करावे.
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल तपासा आणि प्रिंट डाउनलोड करा.