Maharashtra Board 12th Result Live Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा १२ वी चा निकाल (HSC Result) आज म्हणजेच २५ मे दिवशी दुपारी २ वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान HSC बोर्डाची परीक्षा कोणत्याही कोविड निर्बधांशिवाय पार पडली आहे. काल बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार आज निकाल mahresult.nic.in सह अन्य अधिकृत वेबसाईट्सवर जाहीर होणार आहे.
राज्यातून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. राज्यभरात ३ हजार १९५ केंद्रावर यंदा १२ वीची परीक्षा पार पडली.
निकाल जाहीर झाल्यानंतर २६ मे पासून ५ जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येईल. उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे.
यंदाची बारावीची परीक्षा १५४ विषयांसाठी घेण्यात आली. त्यात विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक शिक्षण हे विषय होतं. विज्ञानासाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या चार माध्यमातून तर अन्य शाखांसाठी या चार भाषांसह गुजराती व कन्नड अशा सहा भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली.
HSC Result 2023 Maharashtra: बारावीच्या निकालाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स पाहा एका क्लिकवर
बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या तब्बल ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचं हस्ताक्षर असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या निकालाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. निकालाच्या पत्रकार परिषदेवेळी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचं हस्ताक्षर असणे आणि त्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिलं.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर २६ मे पासून ५ जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या हवाल्याने एबीपी माझाने दिलेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातून गुणपत्रिका (हार्ड कॉपी/ओरिजिनल मार्कशीट) मिळणार आहेत.
निकालाबाबत अडचणी आल्यास मदतीसाठी राज्य मंडळाने सहा फोन नंबरची यादी प्रसिद्ध केली आहे.
राज्यातील एकूण १७ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल ० टक्के लागला आहे. २० ते ३० टक्के निकाल असणारी 3 महाविद्यालये आहेत. 3 महाविद्यालयांचा निकाल ३० ते ४० टक्के लागला आहे. तर राज्यात १०० टक्के निकाल लागलेली २३६९ महाविद्यालय आहेत.
कुठे पाहाल बारावीचा निकाल?
निकाल msbshse.co.in आणि hscresult.mkcl.org, या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.
कसा पाहाल बारावीचा निकाल:
गेल्या पाच वर्षांचा निकाल
२०१८ – ८८.४१ टक्के
२०१९ – ८५.८८ टक्के
२०२० – ९०.६६ टक्के
२०२१ – ९९.६३ टक्के
२०२२ – ९४.२२ टक्के
२०२३ – ९१. २५ टक्के
अवघ्या पाच स्टेप्समध्ये बारावीचा निकाल कसा तपासाल?
यंदाची बारावीची परीक्षा १५४ विषयांसाठी घेण्यात आली. त्यात विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक शिक्षण हे विषय होतं. विज्ञानासाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या चार माध्यमातून तर अन्य शाखांसाठी या चार भाषांसह गुजराती व कन्नड अशा सहा भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली. बारावी परीक्षेच्या १५४ विषयांपैकी २३ विषयांचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती मंडळाने दिली आहे.
Maharashtra Board 12th Result Live Updates : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकाला निकालानुसार यंदा बारावीचा ९१. २५ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात २.९७ टक्के घट झाली आहे. म्हणजेच,यंदा निकालात घट झाली आहेत. मात्र त्यामागचं कारणही मंडळाने दिलं आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर, निकाल msbshse.co.in आणि hscresult.mkcl.org, या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.
पुनर्परिक्षार्थि निकालाची टक्केवारी : 44.33 टक्के
खाजगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी : 82.39 टक्के
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी : 93.43 टक्के
१ लाख ३१ हजार ५६१ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण
१ लाख ७६ हजार ७६३ विद्यार्थ्यांना ३५ टक्के ते ४५ टक्के गुण
शाखानिहाय निकाल
कला - ८४.०५ टक्के
विज्ञान - ९६.९ टक्के
वाणिज्य - ९०.४२ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम - ९१.२५ टक्के
राज्यातून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. राज्यभरात ३ हजार १९५ केंद्रावर यंदा १२ वीची परीक्षा पार पडली.
बारावीच्या निकालात मुंबई- पुण्याची स्थिती काय? पाहा राज्याचा विभागीय मंडळनिहाय निकाल
पुणे : ९३.३४ टक्के
नागपूर - ९०.३५ टक्के
औरंगाबाद - ९१.८५ टक्के
मुंबई - ८८.१३ टक्के
कोल्हापूर - ९३.२८ टक्के
अमरावती - ९२.७५ टक्के
नाशिक - ९१.६६ टक्के
लातूर - ९०.३७ टक्के
कोकण - ९६.१ टक्के
महाराष्ट्र राज्य बारावीच्या निकालाचे जिल्हानिहाय अपडेट्स जाणून घ्या
महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल