राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा, या उद्देशाने सुरू झालेला मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रम काही वर्षांपासून बंद होता. हा उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या फेलोशिपसाठी तरूणांनी अर्ज करावे, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा आणि त्यांच्यातील कल्पकतेचा वापर करून प्रशासकीय कामांना गती द्यावी, हा या फेलोशिपचा उद्देश आहे.
हेही वाचा – सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, भारतीय नौदलात निघाली बंपर भरती, वाचा सविस्तर माहिती
अर्ज करण्याचा कालावधी काय?
मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रमासाठी ७ फेब्रुवारीपासून अर्ज स्वीकारण्यात सुरूवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च आहे. तसेच ३ मार्च ते ५ मार्च दरम्यान मॉक टेस्ट आणि ४ आणि ५ मार्च रोजी ऑनलाईन परीक्षा होणार आहे. या फेलोशिपसाठी ६० तरुणांची निवड करण्यात येणार असून त्यांना राज्य शासनाच्या विविध विभागात वर्षभर काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच उमेदवारांना ७५ हजार रुपये प्रतिमहिना वेतन दिले जाणार आहे.
हेही वाचा – १० वी पास आणि ITI च्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज भरण्यासाठीची माहिती जाणून घ्या
अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक?
अर्ज करण्यासाठी उमेदवाराला १० वी, १२ वी आणि पदवीची गुणपत्रिका, एक वर्ष काल केल्याचं अनुभव प्रमाणपत्र, छायाचित्र व स्वक्षारीची स्कॅन प्रत, पत्त्याचा पुरावा, अशी कागदपत्रे आवश्यक आहे.
फेलोशिपसाठी पात्रता निकष काय?
मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते २६ वर्षेदरम्यान असावे. तसेच संबंधित उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी ६० टक्के गुणांसह पूर्ण केलेली असावी. तसेच त्याला एका वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव असावा.
हेही वाचा – १२ वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची उत्तम संधी; आत्ताच अर्ज करा
फेलोशिपसाठी अटी व शर्थी काय?
दरम्यान, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्ण वेळ कार्यक्रम असून या दरम्यान उमेदवारांना इतर कोणतीही नोकरी, व्यवसाय आणि शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार नाही. हा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना शासनाच्या कायमस्वरुपी सेवेत सामावून घेतल्या जाणार नाही. उमेदवाराला संबंधिक कार्यालयाच्या वेळा आणि आवश्यकतेनुसार प्रवास करणे अनिवार्य असेल. या कालावधीत उमेदवाराला कोणत्याही राजकीय कार्यक्रमात भाग घेता येणार नाही. तसेच उमेदवारांना रूजू होण्यापूर्वी पोलीस पडताळणी आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.