सुहास पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभागांतर्गत सात परिमंडळांतील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील एकूण ४,४९७ पदांची सरळसेवा भरती. जाहिरात-२०२३.

(I) गट-क संवर्गातील विभाग (परिमंडळ) निहाय पदांचा तपशील :

(१) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक- एकूण १,५२८ पदे (अमरावती – १०३, छत्रपती संभाजी नगर – ४३२, सातारा – २६०, नागपूर – १०९, नाशिक – १९५, पुणे – २७३, ठाणे – १५६).

पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण, (ii) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/ सिव्हील व रुरल इंजिनाअरिंग पदविका/ सिव्हील व रुरल कन्स्ट्रक्शन पदविका/ ट्रान्सपोर्टेशन पदविका/ कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी पदविका किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.

(२) सहाय्यक आरेखक – एकूण ६० पदे (अमरावती – ८, छत्रपती संभाजी नगर – १३, सातारा – ७, नागपूर – १४, पुणे – ११, ठाणे – ७).

पात्रता : स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्याुत अभियांत्रिकी पदविका.

(३) कालवा निरीक्षक – एकूण १,१८९ पदे (अमरावती – ५९, छत्रपती संभाजी नगर – ३८८, सातारा – १५३, नागपूर – १००, नाशिक – १२४, पुणे – ३१९, ठाणे – ४६).

(४) मोजणीदार – एकूण ७५८ पदे (अमरावती – ४२, छत्रपती संभाजी नगर – २३६, सातारा – ९८, नागपूर – ५७, नाशिक – ८८, पुणे – २०७, ठाणे – ३०).

(५) सहाय्यक भांडारपाल – एकूण १३८ पदे (अमरावती – ९, छत्रपती संभाजी नगर – ३५, सातारा – २२, नागपूर – २२, नाशिक – १३, पुणे – १९, ठाणे – १८).

(६) दप्तर कारकून – एकूण ४३० पदे (अमरावती – ९, छत्रपती संभाजी नगर – १३४, सातारा – ४९, नागपूर – ७६, नाशिक – ३५, पुणे – ११३, ठाणे – १४).

पद क्र. ३ ते ६ साठी पात्रता : (i) पदवी (कोणतीही शाखा), (ii) टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा ३० श.प्र.मि. मराठी किंवा ४० श.प्र.मि. इंग्रजी उत्तीर्ण.

दिव्यांग/ माजी सैनिक/ अनाथ/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त/ पदवीधर अंशकालीन उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही. त्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांचा कालावधी आणि २ संधी अनुज्ञेय असतील.

(७) अनुरेखक : एकूण २८४ पदे (अमरावती – २१, छत्रपती संभाजी नगर – ६८, सातारा – ३८, नागपूर – ३१, नाशिक – ३३, पुणे – ५९, ठाणे – ३४).

पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण, (ii) आरेखक स्थापत्य हा आय्टीआय्चा अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा शासन मान्यताप्राप्त कला/ रेखाचित्र विद्यालयाची कलाशिक्षक पदविका.

(८) कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक – एकूण ८ पदे (पुणे).

पात्रता : भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ गणित/ इंग्रजी विषयांसह १२ वी उत्तीर्ण किंवा आयटीआयचा भूमापक (सर्वेक्षक) अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी शाखेतील पदविकाधारकाला प्राधान्य देण्यात येईल.

(९) प्रयोगशाळा सहाय्यक – एकूण ३५ पदे (नाशिक – ३३, पुणे – २).

पात्रता : भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ भूगर्भशास्त्र/ कृषी शाखा या विषयातील पदवी उत्तीर्ण.

(१०) आरेखक – एकूण २५ पदे (अमरावती – ३, छत्रपती संभाजी नगर – ५, सातारा – ५, नागपूर – ३, नाशिक – १, पुणे – ६, ठाणे – २).

पात्रता : स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्याुत अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्याुत अभियांत्रिकी पदविका आणि शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील सहाय्यक आरेखक पदावरील कामाचा ३ वर्षांचा अनुभव.

(II) गट-ब संवर्गातील पदे :

(११) भूवैज्ञानिक सहाय्यक – एकूण ५ पदे (नाशिक).

पात्रता : भूगर्भ शास्त्र/ अॅप्लाईड जीऑलॉजी विषयातील पदवी द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण किंवा माईन्स (भारतीय खणीकर्म)/ धनबाद येथील भूगर्भ शास्त्र उपयोजित भूगर्भ शास्त्र पदविका किंवा समकक्ष अर्हता.

(१२) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – एकूण ५ पदे (नाशिक).

पात्रता : भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ भूगर्भ शास्त्र/ कृषी (मृद शास्त्र)/ कृषी (रसायनशास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी.

(१३) वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) – एकूण ४ पदे (नाशिक – २, पुणे – २).

पात्रता : भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ भूगर्भ शास्त्र/ कृषी (मृदशास्त्र/ कृषी रसायनशास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(१४) निम्न श्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित) – एकूण १९ पदे (अमरावती – ३, छत्रपती संभाजी नगर – ६, सातारा – १, नागपूर – २, नाशिक – १, पुणे – ३, ठाणे – ३).

पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण, (ii) लघु लेखनाचा वेग १०० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा : (दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी) खुला प्रवर्ग – १८ ते ४० वर्षे; मागासवर्गीय/ खेळाडू – १८ ते ४५ वर्षे; माजी सैनिक/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त/ दिव्यांग – ४७ वर्षे; अंशकालीन पदवीधारक – ५७ वर्षे.

वेतन श्रेणी : पद क्र. १ व २ साठी पे-लेव्हल – एस – ८ (रु. २५,५०० – ८१,१००); पद क्र. ३ ते ६, ८ साठी पे-लेव्हल – एस – ६ (रु. १९,९०० – ६३,२००); पद क्र. ७, ९ साठी पे-लेव्हल – एस – ७ (रु. २१,७०० – ६९,१००); पद क्र. १० साठी पे-लेव्हल – एस – १० (रु. २९,२०० – ९२,३००); पद क्र. ११ साठी पे-लेव्हल – एस – १४ (रु. ३८,६०० – १,२२,८००); पद क्र. १२ व १४ साठी पे-लेव्हल – एस – १५ (रु. ४१,८०० – १,३२,३००); पद क्र. १३ साठी पे-लेव्हल – एस – १६ (रु. ४४,९०० – १,४२,४००) अधिक नियमाप्रमाणे इतर भत्ते.

निवड पद्धती : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा ही ऑनलाइन (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट). प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील. (सर्व पदांकरिता मौखिक परीक्षा (मुलाखती) घेण्यात येणार नाहीत.)

पद क्र. ३ ते ६ (दप्तर कारकून/ मोजणीदार/ कालवा निरीक्षक/ सहाय्यक भांडारपाल) पदांसाठी एकूण १००, प्रश्न २००, गुण वेळ १२० मिनिटे. (मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक प्रत्येकी २५ प्रश्न)

पद क्र. १४ (निम्नश्रेणी लघुलेखक) पदासाठी – ६० प्रश्न, १२० गुण, वेळ ७५ मिनिटे. (मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी १५ प्रश्न) (लेखी परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळविणारे उमेदवार लघु टंकलेखन चाचणीसाठी पात्र ठरतील.) लेखी परीक्षेतील गुण व लघुटंकलेखन चाचणीमध्ये मिळालेले गुण एकत्र करून अंतिम गुणवत्ता यादी बनविली जाईल.

पद क्र. ३ ते ६ व १४ वगळता इतर पदांसाठी १०० प्रश्न, २०० गुण, वेळ १२० मिनिटे. (मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी १५ प्रश्न, एकूण ६० प्रश्न आणि तांत्रिक प्रश्न – ४०)

पद क्र. ३, ४ व ६ (कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून) या पदांसाठी एकत्रित परीक्षा घेणेत येणार असल्याने सदर पदांसाठी एकच अर्ज भरावा लागणार आहे. सदर पदांसाठी अर्ज सादर करताना प्रथम परिमंडळाची निवड करून सदर पदांच्या निवडीचा प्राधान्यक्रम द्यावा लागेल.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https:// wrd. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ऑनलाइन अर्ज करताना स्कॅन करून अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी जाहिरातीमधील पॅरा ८ मध्ये दिलेली आहे.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – रु. १,०००/-, मागासवर्गीय – रु. ९००/-. (माजी सैनिकांना परीक्षा शुल्क माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज https:// wrd. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी (२३.५५ वाजे) पर्यंत करावेत.