Maharashtra HSC Exam Time Table 2025: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते ११ मार्च २०२५ या कालावधीत घेतली जाणार आहे.
बोर्डाने २१ नोव्हेंबर २०२४ रोजी mahassscboard.in. या अधिकृत वेबसाइटवर ‘महाराष्ट्र बारावीचे वेळापत्रक २०२५’ (Maharahtra HSC time table 2025) जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील २०२५च्या बारावीच्या वेळापत्रकात परीक्षेच्या तारखा, दिवस, वेळ आणि विद्यार्थ्यांसाठी सामान्य सूचना यांचा उल्लेख आहे.
बोर्डाने बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली आहे. शाळांनी ही हॉल तिकीट छापून, विद्यार्थ्यांमध्ये त्या तिकिटांचे वाटप केले पाहिजे. परीक्षेच्या सर्व दिवशी महाराष्ट्र बारावी २०२५ चे प्रवेशपत्र सोबत बाळगणे महत्त्वाचे आहे; अन्यथा विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा देता येणार नाही.
२०२४ चे वेळापत्रक आणि निकाल
गेल्या शैक्षणिक सत्रात MSBSHSE बोर्डाने ऑगस्ट २०२४ मध्ये महाराष्ट्र बारावीचा पुरवणी निकाल २०२४ जाहीर केला. त्यांनी १६ जुलै ते ९ ऑगस्ट २०२४ दरम्यान महाराष्ट्र बारावीच्या पुरवणी परीक्षा घेतल्या. बोर्डाने २१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२४ अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गेल्या वर्षी इयत्ता बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ दरम्यान पेन आणि पेपर स्वरूपात घेण्यात आल्या. तर, गेल्या वर्षी बोर्डाने फेब्रुवारी २०२४ मध्ये महाराष्ट्र बारावीची हॉल तिकिटे जारी केली होती. महाराष्ट्र बारावीच्या २०२४ च्या परीक्षेच्या तारखा २९ ऑगस्ट २०२३ रोजी जाहीर झाल्या.