Maharashtra Board Result 2024 Marksheet Download from Digilocker:  दहावी आणि बारावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संपूर्ण राज्यात परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाही काॅपीमुक्त परीक्षा झाल्यात. मंडळाकडून कित्येक महिन्यांपासून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी काम सुरू होते. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती म्हणजे या परीक्षेच्या निकालाची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच निकाल हा जाहिर केला जाऊ शकतो. अगोदर बारावीचा निकाल जाहिर होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहिर होऊ शकतो. दरम्यान विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की ते त्यांचे १०वी आणि १२वी बोर्डाचे निकाल डिजिलॉकरवर देखील पाहू शकतात.

महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने माहिती दिली की २०१७ पासूनचे महाराष्ट्रातील किमान ५.४ लाख विद्यार्थ्यांचे डिजिटल प्रमाणपत्रे डिजिलॉकरवर उपलब्ध आहेत. १८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या राज्य मंडळाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एमएसबीएसएचएसई) अध्यक्षा शकुंतला काळे म्हणाल्या, “बोर्डाने प्रमाणपत्रांचे रेकॉर्ड डिजिटल केले आहेत. आणि १९९० पासून ते आजच्या तारखेपर्यंत डिजीलॉकरमध्ये ३.५ कोटी १२वीच्या विद्यार्थ्याचे रेकॉर्ड आणि ५.५ कोटी १०वीच्या रेकॉर्ड आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : “प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंना बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यास रोखलं”, सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sharad pawar eknath shinde ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
Supriya Sule On Mahayuti
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “भाजपमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतभेद, फडणवीस एक सांगतात तर…”, सुप्रिया सुळेंची खोचक टिप्पणी!
ngo voting awareness
मुंबई: बोटावरची शाई दाखवा आणि वेगवेगळ्या सवलती मिळवा, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध खाजगी संस्थांचा पुढाकार
Maharashtra Assembly Election 2024 Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर अमोल मिटकरींनी मागितली माफी

निकालाचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र एसएससी एचएससी निकाल २०२४ डाउनलोड करण्यासाठी डिजीलॉकर कसे वापरावे?

विद्यार्थ्यांनी जाणून घ्या डिजिलॉकरवर डिजिलॉकरवर नोंदणी आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रे डाउनलोड कसे करावे. डिजिलॉकरवर १० वी आणि १२ वीचे निकालपत्र अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे डिजिलॉकर खाते असणे आवश्यक आहे.

MSBSHSE निकाल २०२४: डिजीलॉकर खाते कसे तयार करावे?

१. DigiLocker च्या साईटला भेट द्या – http://www.digilocker.gov.in
२. इनपुट फील्डसह एक नवीन विंडो उघडेल
३. तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि नंतर ‘Continue’ बटणावर क्लिक करा
४. या नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. नवीन विंडोमध्ये दिलेल्या जागेत हा OTP भरा.
५. नंतर ‘Verify’ बटणावर क्लिक करा.
६. लिंक नवीन विंडोवर पुनर्निर्देशित केली जाईल
७. खात्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड सेट करा
८. पासवर्डमध्ये वापरकर्त्याचं नाव नसावं
९. शेवटी, तुमचा आधार क्रमांक सबमिट करा आणि तो OTP किंवा फिंगरप्रिंट पर्यायाद्वारे सेट करा.
१०. तुम्ही आता डिजिलॉकर ॲपवर यशस्वीरित्या साइन अप केले आहे.

महाराष्ट्र एचएससी एसएससी निकाल 2024: डिजीलॉकरवरून महाराष्ट्र १०वी १२वीचा निकाल कसा डाउनलोड करायचा?

१.युजरनेम आणि पासवर्ड वापरून डिजिलॉकर ॲपवर लॉग इन करा
२. ‘प्रोफाइल’ पेजवर जा आणि आधार क्रमांक सिंक करा. डिजीलॉकर खाते आधीपासून आधार क्रमांक वापरून तयार केले असल्यास, पुन्हा करण्याची गरज नाही.
३. डाव्या साइडबारमधील ‘पुल पार्टनर डॉक्युमेंट्स’ बटणावर क्लिक करा.
४. पुढील स्क्रीनवर दोन ड्रॉपडाउन असतील.
५. पहिल्या ड्रॉपडाउनमध्ये, ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ’ निवडा.
६. पुढील ड्रॉप-डाउनमध्ये, मार्कशीट निवडा म्हणजे HSC/ SSC मार्कशीट/ स्थलांतर किंवा उत्तीर्ण इ.
७. पुढील स्क्रीनमध्ये महाराष्ट्र एसएससी ॲडमिट कार्ड/महाराष्ट्र एचएससी ॲडमिट कार्डवर नमूद केल्याप्रमाणे उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि रोल नंबर यासारखे आवश्यक तपशील भरा.
८. ‘Get Document’ वर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र HSC/Maharashtra SSC डिजिटल मार्कशीट/प्रमाणपत्र डाउनलोड होईल.
९. ही कागदपत्रे डिजीलॉकर खात्यात सेव्ह करण्यासाठी सेव्ह टू लॉकर बटणावर क्लिक करा.

हेही वाचा >> १०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या

डिजिलॉकर ॲप काय आहे?

डिजीलॉकर हे कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे डिजिटल पद्धतीने आपल्याजवळ बाळगण्याचे आणि पडताळणीसाठी भारत सरकारचे क्लाउड-आधारित व्यासपीठ आहे. उमेदवार खालील उद्देशांसाठी DigiLocker वापरू शकतात:

कोणतेही महत्त्वाचे कागदपत्रे यामध्ये तु्म्ही ठेवू शकता.

कागदपत्रे डिजिटल पद्धतीने सामायिक करु शकता

डिजीलॉकर वापरण्याचे फायदे

शालेय प्रमाणपत्र आणि मार्कशीट व्यतिरिक्त आधार कार्ड, कोविड १९ लसीकरण प्रमाणपत्र, वाहन नोंदणी आणि ड्रायव्हिंग लायसन्सची सुविधा डिजीलॉकरवर उपलब्ध आहे. आपण या अॅपवर एसएससी मार्कशीट, एचएससी मार्कशीट, रेशनकार्ड, निवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र या सुविधेचा लाभ घेऊ शकता.आपली सर्व महत्त्वाची कागदपत्रे या लॉकरमध्ये ठेवली जाऊ शकतात.