राज्यात होऊ घातलेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अद्याप ज्या तरुणांनी अर्ज केला नाही, त्यांच्यासाठी एक खूशखबर आहे. कारण- राज्य सरकारने पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मराठा समाजाच्या युवकांना कागदपत्रे अपलोड करण्यात अडचणी येत असल्याने ही मुदतवाढ दिल्याचे सांगितले जात आहे; ज्यामुळे आधी अर्ज करण्यासाठीची ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. पण, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वय, नोकरीचे ठिकाण, पद या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यावी.
एकूण रिक्त पदे :
१७,३११
पदांची नावे आणि तपशील :
१) पोलीस शिपाई आणि पोलीस बॅण्ड्समन – ९,५३२
२) पोलीस शिपाई-वाहनचालक – १६८६
३) पोलीस शिपाई-SRPF – ४,२९३
४) कारागृह शिपाई – १८००
नोकरी ठिकाण :
संपूर्ण महाराष्ट्र
कोणत्या शहरात किती रिक्त जागांसाठी भरती होणार आहे याची तपशीलवार माहिती अधिकृत वेबसाइटवर पाहा.
शैक्षणिक पात्रता :
पोलीस शिपाई, पोलीस शिपाई-वाहनचालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई पदांसाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पोलीस बॅण्ड्समन पदासाठी इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता:
पुरुष
उंची – १६५ सेंमीपेक्षा कमी नसावी.
छाती – न फुगवता ७९ सेंमीपेक्षा कमी नसावी.
महिला
उंची – १५५ सेंमीपेक्षा कमी नसावी.
शारीरिक परीक्षा:
धावणे अंतर (मोठी)
पुरुष– १६०० मीटर, महिला- ८०० मीटर
धावणे अंतर (लहान)
पुरुष– १०० मीटर, महिला- १०० मीटर
वयाची अट
१) पोलीस शिपाई, पोलीस बॅण्ड्समन व कारागृह शिपाई : १८ ते २८ वर्षे
२) पोलीस शिपाई-वाहनचालक : १९ ते २८ वर्षे
३) पोलीस शिपाई-SRPF : १८ ते २५ वर्षे
मागास प्रवर्ग : ०५ वर्षे सूट
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ एप्रिल २०२४
अधिकृत वेबसाईट
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
अधिकृत जाहिरात
https://www.mahapolice.gov.in/uploads/revised_1.pdf
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx#