Maharashtra Postal Circle Recruitment 2023: भारतीय डाक (Post Office) महाराष्ट्र सर्कल अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कलने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ ही आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती २०२३ ची माहिती जाहिरात क्रमांक 17-67/2023-GDS. मध्ये देण्यात आली आहे.
पदाचे नाव – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
एकूण रिक्त पदे – ३१५४
शैक्षणिक पात्रता –
१० वी पास + मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
हेही वाचा- पनवेल महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ ३७७ पदांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – १८ ते ४० वर्षे.
- ओबीसी – ३ वर्षांची सूट.
- मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज फी –
- खुला/ ओबीसी/ EWS – १०० रुपये.
- मागासवर्गीय/ महिला/ PWD यांना फी नाही.
अधिकृत बेवसाईट – https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ३ ऑगस्ट २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ ऑगस्ट २०२३
भरती संबंधित सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/16rJ2qWSNBXw7KzTV4q5ZGxZhXOp8UkmB/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य वाचा.