MSBSHSE Class 10th Result 2023 : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) ३१ मे पर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता १० वीचा निकाल जाहीर करेल अशी शक्यता आहे. मात्र बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण निकालाची तारीख जशी जवळ येतेय तसे दहावीच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढत आहे. दहावीचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना mahahsscboard.in वर ऑनलाईन पाहता येईल. याशिवाय mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल उपलब्ध असेल.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट
१) http://www.mahresult.nic.in
२) http://sscresult.mkcl.org
३) https://ssc.mahresults.org.in
SSC Result 2023 : असा पाहा निकाल
१) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जा.
२) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा. (आईचे नाव)
४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
५) निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
महाराष्ट्र बोर्डाच्या १० वीच्या मार्कशीटमध्ये विद्यार्थ्याचे नाव, शाळा क्रमांक, केंद्र क्रमांक, आईचे नाव, प्रत्येक विषयात मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी, पात्रता स्थिती यांचा समावेश असेल. जे विद्यार्थी महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले त्यांना पुरवणी परीक्षेला बसावे लागेल.
दहावीच्या निकालासंदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी
१) महाराष्ट्रातील इयत्ता दहावीच्या बोर्डाचे नाव:
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र
२) निकालाची तारीख
- लवकरच जाहीर होईल
३) इयत्ता दहावीच्या निकालाची अधिकृत वेबसाइट
- mahresult.nic.in
४) आवश्यक माहिती
- हॉल तिकीट, रोल नंबर आणि आईचे नाव
५) इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेची तारीख
- २ मार्च ते २५ मार्च
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यंदा २३ हजार १० शाळांमदील जवळपास १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यामुळे निकालानंतर आता १५ लाख हून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चित होणार आहे.
दहावीच्या निकालानंतर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र
१) दहावीची मार्कशीट
२) आधार कार्ड, पॅनकार्ड
३) पासपोर्ट साईज फोटो
४) शाळा सोडल्याचा दाखला
५) रहिवासी पुरावा, घरचा पत्ता असलेला पुरावा (रेशनकार्ड, लाईट बिल)
६) जात प्रमाणपत्र
गरजेनुसार इतर काही कागदपत्रांची आवश्यकता भासू शकते.