Maharashtra SSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज, दिनांक २७ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळविलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर निकाल जाहीर झाल्यानंतर पाहता येणार आहे. विद्यार्थी ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकना ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती राज्य मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, विविध मार्गानी अवघ्या काही स्टेप्स फॉलो करुन दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. शिवाय, डिजिलॉकरच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या निकालाची डिजिटल प्रत डाउनलोड आणि सेव्ह करू शकणार आहेत.

महाराष्ट्र एसएससी निकाल २०२४ डाउनलोड करण्यासाठी डिजीलॉकर कसे वापरावे?

Idol exam today but some students don't have admit cards for exam Mumbai
‘आयडॉल’ची आज परीक्षा; मात्र काही विद्यार्थ्यांच्या हातात ‘प्रवेशपत्र’च नाही; मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, परीक्षा केंद्रांवर संभ्रमाचे वातावरण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
MPSC announced that it will now conduct screening exams for 33 posts of various types
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून तब्बल ३३ पदांच्या चाळणी परीक्षेसाठी…
nadi tarangini latest news in marathi
‘नाडी तरंगिणी’द्वारे अचूक नाडी परीक्षा! पुण्यातील नवउद्यमीने विकसित केले डिजिटल उपकरण
Maharashtra Board s Class 12admit card will be available online from Friday January 10
राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
Tata Education Trust makes substantial provision for 115 employees Mumbai news
‘टीस’च्या कर्मचाऱ्यांना मार्च २०२६ पर्यंत दिलासा; टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून ११५ कर्मचाऱ्यांसाठी भरीव तरतूद
online exam for post of Clerk and Constable of Cooperative Bank canceled due to technical glitches
चंद्रपूर : परीक्षार्थ्यांना ऑनलाइन उत्तरपत्रिका मिळताच जिल्हा बँकेचे संचालक मंडळ अस्वस्थ; भरती प्रक्रिया…

विद्यार्थ्यांनी जाणून घ्या डिजिलॉकरवर डिजिलॉकरवर नोंदणी आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रे डाउनलोड कसे करावे. डिजिलॉकरवर १० वीचा निकालपत्र अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे डिजिलॉकर खाते असणे आवश्यक आहे.

SSC निकाल 2024: डिजीलॉकर खाते कसे तयार करावे?

१. DigiLocker च्या साईटला भेट द्या – http://www.digilocker.gov.in
२. इनपुट फील्डसह एक नवीन विंडो उघडेल
३. तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि नंतर ‘Continue’ बटणावर क्लिक करा
४. या नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. नवीन विंडोमध्ये दिलेल्या जागेत हा OTP भरा.
५. नंतर ‘Verify’ बटणावर क्लिक करा.
६. लिंक नवीन विंडोवर पुनर्निर्देशित केली जाईल
७. खात्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड सेट करा
८. पासवर्डमध्ये वापरकर्त्याचं नाव नसावं
९. शेवटी, तुमचा आधार क्रमांक सबमिट करा आणि तो OTP किंवा फिंगरप्रिंट पर्यायाद्वारे सेट करा.
१०. तुम्ही आता डिजिलॉकर ॲपवर यशस्वीरित्या साइन अप केले आहे.

महाराष्ट्र एसएससी निकाल 2024: डिजीलॉकरवरून महाराष्ट्र १०वीचा निकाल कसा डाउनलोड करायचा?

१.युजरनेम आणि पासवर्ड वापरून डिजिलॉकर ॲपवर लॉग इन करा
२. ‘प्रोफाइल’ पेजवर जा आणि आधार क्रमांक सिंक करा. डिजीलॉकर खाते आधीपासून आधार क्रमांक वापरून तयार केले असल्यास, पुन्हा करण्याची गरज नाही.
३. डाव्या साइडबारमधील ‘पुल पार्टनर डॉक्युमेंट्स’ बटणावर क्लिक करा.
४. पुढील स्क्रीनवर दोन ड्रॉपडाउन असतील.
५. पहिल्या ड्रॉपडाउनमध्ये, ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ’ निवडा.
६. पुढील ड्रॉप-डाउनमध्ये, मार्कशीट निवडा म्हणजे SSC मार्कशीट/ स्थलांतर किंवा उत्तीर्ण इ.
७. पुढील स्क्रीनमध्ये महाराष्ट्र एसएससी ॲडमिट कार्ड/महाराष्ट्र एचएससी ॲडमिट कार्डवर नमूद केल्याप्रमाणे उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि रोल नंबर यासारखे आवश्यक तपशील भरा.
८. ‘Get Document’ वर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र Maharashtra SSC डिजिटल मार्कशीट/प्रमाणपत्र डाउनलोड होईल.
९. ही कागदपत्रे डिजीलॉकर खात्यात सेव्ह करण्यासाठी सेव्ह टू लॉकर बटणावर क्लिक करा.

हेही वाचा >>SSC Result 2024: दहावीच्या निकालाआधी विद्यार्थ्यांसाठी खूशखबर; विज्ञानाच्या पेपरमध्ये ‘या’ प्रश्नाला मिळणार पूर्ण मार्क

डिजिलॉकर ॲप काय आहे?

डिजीलॉकर हे कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे डिजिटल पद्धतीने आपल्याजवळ बाळगण्याचे आणि पडताळणीसाठी भारत सरकारचे क्लाउड-आधारित व्यासपीठ आहे. उमेदवार खालील उद्देशांसाठी DigiLocker वापरू शकतात:

कोणतेही महत्त्वाचे कागदपत्रे यामध्ये तु्म्ही ठेवू शकता.

कागदपत्रे डिजिटल पद्धतीने सामायिक करु शकता

डिजीलॉकर वापरण्याचे फायदे

शालेय प्रमाणपत्र आणि मार्कशीट व्यतिरिक्त आधार कार्ड, कोविड १९ लसीकरण प्रमाणपत्र, वाहन नोंदणी आणि ड्रायव्हिंग लायसन्सची सुविधा डिजीलॉकरवर उपलब्ध आहे. आपण या अॅपवर एसएससी मार्कशीट, एचएससी मार्कशीट, रेशनकार्ड, निवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र या सुविधेचा लाभ घेऊ शकता.आपली सर्व महत्त्वाची कागदपत्रे या लॉकरमध्ये ठेवली जाऊ शकतात.

Story img Loader