Maharashtra SSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज, दिनांक २७ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळविलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर निकाल जाहीर झाल्यानंतर पाहता येणार आहे. विद्यार्थी ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकना ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती राज्य मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, विविध मार्गानी अवघ्या काही स्टेप्स फॉलो करुन दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. शिवाय, डिजिलॉकरच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या निकालाची डिजिटल प्रत डाउनलोड आणि सेव्ह करू शकणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा