MSAMB recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामध्ये सध्या ‘विधी अधिकारी [लीगल ऑफिसर] आणि सहायक विधी अधिकारी [सहायक लीगल] ऑफिसर’ या पदांसाठी भरती सुरू आहे.
या रिक्त जागांवर नोकरी मिळवायची असल्यास उमेदवार ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतो. अर्जाची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी ठेवण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष काय आहे जाणून घ्या.
MSAMB recruitment 2024 : पात्रता निकष
लीगल ऑफिसर आणि सहायक लीगल या पदासाठी एकूण चार जागा उपलब्ध आहेत.
या पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराकडे कायदेविषयक किंवा विधी पदवीधर असणे आवश्यक. अथवा विधी अधिकारी या पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
MSAMB recruitment 2024 – अधिकृत वेबसाईट –
https://www.msamb.com/
MSAMB recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1WzfY8R_G5lyHL2JM56vNGZCDqmPqKr7C/view
MSAMB recruitment 2024 : अर्जाची अंतिम तारीख
वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करू शकतात.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराने dirmktms@gmail.com या ई-मेल अॅड्रेसचा वापर करावा.
वरील पदांच्या नोकरीचे स्थळ पुणे आहे.
या जागेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ६५ वर्षे, अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी २०२४ ही आहे.
इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज भरावा.
ऑफलाइन अर्जाचे फॉर्म खाली दिलेल्या पत्त्यावर जमा करावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता- पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय, तिसरा मजला, नवीन मध्यवर्ती इमारत, बी. जे. रोड, पुणे-०१.
वरीलपैकी कोणत्याही पदांसंदर्भात उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा अधिसूचना वाचावी. वेबसाईट आणि अधिसूचना या दोन्हीची लिंक वर दिलेली आहे.