MahaGenco / Mahanirmiti Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Maharashtra State Power Generation Company Limited) अंतर्गत लिमिटेड अंतर्गत (MAHAGENCO) विविध जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या जागांबाबतची अधिसूचना कंपनीकडून जारी करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://mahagenco.in/ या वेबसाइटवर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा यांबाबतची सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊ.

MahaGenco Bharti 2024 : रिक्त पदे आणि पदसंख्या –

Meta AI in whatsapp
Meta AI in WhatsApp: आता AI थेट तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर; वाट्टेल ते विचारा, ते सगळं सांगेल! वाचा नेमकं वापरायचं कसं?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
COEP Pune recruitment 2024
COEP Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती
pgcil engineer trainee recruitment 2024 apply online for 435 engineer trainee posts check eligibility and others details
PGCIL Recruitment 2024 : इंजिनिअर्स तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विभागात ४३५ पदांसाठी भरती सुरू, आजच करा अर्ज
success story Heartbroken lover become officer after his girlfriend reject him
VIDEO: स्पर्धा परीक्षेत नापास झाला अन् प्रेयसी सोडून गेली; पुढच्या वर्षी पास होत तिच्याच घरासमोर लावल्या ७५ तोफा
BARC Mumbai Recruitment 2024
BARC Mumbai Recruitment 2024 : भाभा अणु संशोधन केंद्रात नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती
School Student Funny Marathi Love Letter Viral
PHOTO: “प्रिय आकाश तु मला प्रपोज केलं” शाळेतल्या मुलांचं ‘लव्ह लेटर’ व्हायरल; वाचून पोट धरुन हसाल

ऑफिसर (Officer) – २ पदे आणि आणि असिस्टंट ऑफिसर (Assistant Officer) पदाच्या १३ म्हणजेच एकूण १५ रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.

MahaGenco Bharti 2024 : शैक्षणिक पात्रता –

ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बॅचलर पदवी असणे गरजेचे आहे. तर, असिस्टंट ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इंजिनियरिंगची पदवी असायला हवी.

MahaGenco Bharti 2024 : वयोमर्यादा –

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६० वर्षे असावे.

हेही वाचा…Success Story: एकेकाळी चिकटवली पोस्टर्स, एका खोलीतून व्यवसायाला सुरुवात; पाहा ‘बालाजी वेफर्स’च्या निर्मात्यांचा प्रेरणादायी प्रवास…

MahaGenco Bharti 2024 : अर्ज शुल्क –

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ९४४ रुपये भरावे लागणार आहेत. (८०० रुपये application fee + १५५ रुपये GST)

MahaGenco Bharti 2024 : अर्ज पाठविण्याचा पत्ता –

उमेदवाराने अर्ज ‘ Dy. General Manager (एचआर-आरसी/डीसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड Estrella बॅटरीज एक्स्पान्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०० ०१९’ या पत्त्यावर पाठवायचा आहे.

MahaGenco Bharti 2024 : अर्ज करण्याची शेवटची तारीख –

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १५ जुलै २०२४ पूर्वी अर्ज करायचा आहे.

MahaGenco Bharti 2024 : महत्त्वाच्या सूचना ज्या अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने लक्षात ठेवल्या पाहिजेत, त्या पुढीलप्रमाणे :

१. या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

२. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

लिंक – https://mahagenco.in/wp-content/uploads/2024/06/Advt-08_2024.pdf

३.अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला उमेदवाराने भेट द्यावी.

लिंक – https://mahagenco.in/

४. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२४ असणार आहे. त्यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

५. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावेत. त्याशिवाय अर्ज मान्य केला जाणार नाही.