Maharashtra Talathi Bharati Result 2023: राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र महसूल विभागाने तलाठी भरती २०२३ परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. जे उमेदवार भरती परीक्षेसाठी बसले होते ते mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट दऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. महाराष्ट्र तलाठ्यांची लेखी परीक्षा ३६ जिल्ह्यांमध्ये ५७ शिफ्टमध्ये पार पडली. १,०४१,७१३, नोंदणीकृत उमेदवारांपैकी ८६४,००० (८३.०३ %) परीक्षेत सहभागी झाले होते.२०२३ मधील महाराष्ट्र तलाठ्यांची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झाली. निवड मंडळाने आता अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- मोठी बातमी! तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर

महाराष्ट्र तलाठी अंतिम निकाल २०२३ कसा तपासायचा?

महाराष्ट्र तलाठी भारती निकाल तपासण्यासाठी उमेदवार कसा पाहू शकतात.
स्टेप्स १ : mahabhumi.gov.in या महाराष्ट्र महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
स्टेप २: मुख्या पेजवर “तलाठी थेट सेवा भरती-२०२३ जिल्हानिहाय निवड यादी आणि प्रतीक्षा यादी” या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३. तुम्हाला एका नवीन पेज दिसेल तुम्ही जिथून परीक्षेसाठी अर्ज केला होता तो प्रदेश निवडा.
स्टेप ४. तलाठी थेट सेवा भरती-२०२३च्या निकालाची PDF स्क्रीनवर प्रदर्शित केली जाईल.
स्टेप ५: यादीमध्ये तुमचे नाव आणि रोल नंबर टाकून तपासा
स्टेप ६. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट घ्या

Talathi Final Result 2023 : महाराष्ट्र तलाठी अंतिम निकाल – मुंबई -लिंक:https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/Downloads/TalathiSelectionList/MUMBAI%20CITY.pdf
Talathi Final Result 2023 महाराष्ट्र तलाठी अंतिम निकाल – नागपूर
https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/Downloads/TalathiSelectionList/NAGPUR.pdf
Talathi Final Result 2023 : महाराष्ट्र तलाठी अंतिम निकाल – इतर सर्व प्रदेश-
https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/SelectionList

हेही वाचा – कर्मचारी राज्य विमा महामंडळाद्वारे १४६ पदांसाठी होणार भरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

अकोला, बीड, बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिवा, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, मुंबई उपनगरे, वर्धा आणि वाशिम, नागपूर, परभणी, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर यासह सर्व प्रदेशांसाठीचा तलाठी भरती निकाल २०२३ जाहीर झाला आहे.अधिक माहितीसाठी, उमेदवारांना mahabhumi.gov.in ची अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला दिला जातो.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra talathi final result 2023 declared at mahabhumi govin download selection list here snk
Show comments