MahaTransco Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) ही महाराष्ट्र शासनाची एक विद्युत पारेषण उपयोगिता कंपनी असून ती भारतातील सर्वात मोठ्या राज्य विद्युत पारेषण उपयोगिता कंपन्यांपैकी एक आहे. याच कंपनीमध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महापारेषणमध्ये विविध पदांच्या तब्बल ३१२९ जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कंपनीच्या http://www.mahatransco.in या अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्यावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापारेषण भरती – २०२३

एकूण रिक्त पदे – ३,१२९

हेही वाचा- नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, मुलाखतीची तारीख जाणून घ्या

पदाचे नाव –

कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त आणि लेखा), कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ – ॥ (पारेषण प्रणाली), सहायक तंत्रज्ञ (सामान्य), सहायक तंत्रज्ञ (सामान्य), अनुसूचित जमातीकरिता विशेष भरती मोहिम, टंकलेखक (मराठी)

टीप – रिक्त पदांची संख्या तपशिलवार जाहिरात देताना बदलू शकते.

  • भरतीसाठी आवश्यक वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव, सामान्य अटी आणि शर्ती, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, कागदपत्रे यांचा समावेश असून या संबंधातीत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कंपनीच्या http://www.mahatransco.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. तसेच पुढील जाहिरातीमध्ये ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी यूआरएल (लिंक) विकसित करण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी कंपनीची वेबसाईट अवश्य पाहावी.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahatransco bharti 2023 maharashtra state vidyut mandal transmission company limited recruitment for 3129 vacancies know in detail jap
Show comments