MahaTransco recruitment 2024 : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (महाट्रान्सको) म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत असिस्टंट इंजिनिअर पदांच्या एकूण १३० रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छूक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात त्यासाठी https://www.mahatransco.in/ या वेबसाईटला भेट द्या. ऑनलाइन अर्ज वगळता, इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२४ आहे.
MahaTransco Bharti 2024 पात्रता निकष (Eligibility Criteria)
महाट्रान्सको सहाय्यक अभियंता भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रियेमध्ये केवळ लेखी चाचणी (ऑनलाइन चाचणी) घेतली जाईल. या पदासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना ऑनलाइन चाचणीसाठी बोलावले जाईल. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केल्याची खात्री करावी. त्यांची प्रमाणपत्रे/दस्तऐवज/पात्रता यांची पडताळणी नियुक्ती देण्यापूर्वी केली जाईल. पडताळणी प्रक्रियेदरम्यान उमेदवार अपात्र/पात्र नसल्यास नियुक्तीचा आदेश जारी केला जाणार नाही.
महाट्रान्सको येथे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ५७ वर्ष इतकी निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा – पुण्यातील IIITमध्ये नोकरीची संधी! पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज; मिळेल चांगला पगार!
MahaTransco Bharti 2024 अर्ज शुल्क (application charge)
सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७०० रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागतील तर राखीव जाती प्रवर्ग आणि आर्थिकदृष्या सक्षम नसणारे आणि अनाथ यांनी अर्ज शुल्क ३५० रुपये दिले जाईल.
MahaTransco Bharti 2024 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )
सहाय्यक अभियंता म्हणजेच असिस्टंट इंजिनिअर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञानमध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
अधिसुचना – https://www.mahatransco.in/uploads/career/career_1707533867.pdf
अर्ज करण्याची लिंक –https://ibpsonline.ibps.in/msetcljan24/
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/career/active
हेही वाचा – AIESL Recruitment 2024 : एयर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी १०० रिक्त जागांची होणार भरती!
MahaTransco Bharti 2024 अर्ज करा करावा (How To Apply )
- या भरतीकरिता उमेदवारांनी http://www.mahatransco.in या वेबसाईटला भेट द्यावी.
- “ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा” या लिंकवर क्लिक करा.
- अर्जासाठी आवश्यक तपशील भरा. कागदपत्रे जमा करा आणि सबमिट बटनवार क्लिक करा.
- भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत डाऊनलोड करा.
- करून उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.