Mail Motor Service Mumbai Bharti 2023: भारतीय डाक विभागाच्या मेल मोटर सेवा विभागाकडून कुशल कारागीर पदाच्या काही रिक्त जागा भरण्यासाठीची नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. मेल मोटर सेवा कुशल कारागिरांच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०२३ आहे. मेल मोटर सेवा भरतीसाठीची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊया.

मेल मोटर सेवा (Mail Motor Service) भरतीसाठी पात्र उमेदवार त्यांचे अर्ज http://www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे करु शकतात. मेल मोटर सर्व्हिस मुंबई (इंडिया पोस्टल डिपार्टमेंट मुंबई) भरती बोर्ड, मुंबई यांनी एप्रिल २०२३ च्या जाहिरातीत एकूण १० रिक्त पदांची घोषणा केली आहे. त्यानुसार ही भरती केली जात आहे.

Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
aditi tatkare ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: आता ‘या’ महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, संख्या १२ लाखांच्या घरात!
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
High Court provides relief to taxpayers extends deadline for filing income tax returns till January 15
करदात्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
MHADA Konkan Board lottery Application sale-approval process extended by 15 days again
म्हाडा कोकण मंडळ सोडत : अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा १५ दिवसांची मुदवाढ
pune state government relaxed age limit for MPSC exams by one year as exception
वयाधिक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी… एमपीएससीच्या दोन परीक्षांसाठी अर्ज भरण्याची संधी !
Decision to increase maximum age limit by one year for recruitment to various posts of MPSC
‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…

हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ ७८ पदांसाठी भरती सुरू, अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या

एकूण रिक्त पदे – १०

पदाचे नाव व रिक्त पदे पुढीलप्रमाणे –

पदाचे नाव ट्रेडरिक्त पदे
मेकॅनिक (मोटर व्हेईकल)
मोटर व्हेईकल इलेक्ट्रिशियन
कुशल कारागीरवेल्डर
टायरमन
टिनस्मिथ
पेंटर
ब्लॅकस्मिथ


शैक्षणिक पात्रता –

संबंधित विषयात ITI किंवा ८ वी पास आणि १ वर्षाचा अनुभव (मेकॅनिक पदासाठी जड वाहन चालक परवाना).

वयोमर्यादा –

हेही वाचा- AIR India Bharti 2023: इंजिनिअर्सना एअर इंडियात काम करण्याची मोठी संधी! ‘या’ हजारो पदासांठी लवकरच मेगाभरती

खुला प्रवर्ग – १८ ते ३० वर्षे.

ओबीसी – ३ वर्षांची सूट.

मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

अर्ज शुल्क – अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

नोकरी ठिकाण – मुंबई

महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची सुरवात – ५ फेब्रुवारी २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मे २०२३ सायंकाळी ५ पर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-A, सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई – 400018

भरतीची जाहीरात पाहण्यासाठी उमेदवारांनी या https://drive.google.com/file/d/1nT3YJYTS0pjEYU_g0qULk5odc_6n1-XX/view लिंकला अवश्य भेट द्यावी.

Story img Loader