Billionaire Rizwan Sajan Success Story : भारतात असे अनेक उद्योगपती आहेत की, ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष बाब म्हणजे यातील काही लोकांना वारसा हक्काने कोणतीही संपत्ती मिळाली नाही; पण त्यांनी स्वबळावर देशातच नव्हे, तर परदेशातही स्वत:चे नाव बनवले आणि एक मोठे व्यावसायिक साम्राज्य उभे केले. आम्ही तुम्हाला अशाच एका यशस्वी उद्योगपतीची यशोगाथा सांगणार आहोत, जो एकेकाळी मुंबईतील घाटकोपरमध्ये झोपडपट्टीत राहून छोट्या-छोट्या नोकऱ्या करायचा, तो आज दुबईतील सर्वांत श्रीमंत भारतीयांपैकी एक आहे. त्यांचा केवळ दुबईतच नाही, तर अनेक देशांमध्ये व्यवसाय आहे.

सामान्यतः लोक परदेशांत कामासाठी जातात, विशेषतः दुबई आणि इतर आखाती देशांमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय रोजगाराच्या शोधात जातात. याच उद्देशाने मुंबईतील एक तरुण कुवेतला पोहोचला, जिथे त्याने मेहनतीने आपले नशीबच बदलून टाकले. पण, आज रिझवान साजन यांची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
boney kapoor financial crisis roop ki raani movie
दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र

रिझवान साजन यांनी अथक परिश्रम आणि जिद्द या बळावर गरिबीकडून श्रीमंतीकडे प्रवास केला. मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारा मुलगा देशातच नाही, तर परदेशांतही यशाची शिखरे गाठेल, असे कुणालाही वाटले नव्हते; पण रिझवान यांनी ते शक्य करून दाखवले. मुंबईतील घाटकोपर येथे राहणाऱ्या रिझवान साजन यांचे सुरुवातीचे आयुष्य खूप संघर्षमय होते. ते घाटकोपरच्या झोपडपट्टीत आपल्या कुटुंबासह हलाखीच्या परिस्थितीत राहत होते, त्यावेळी त्यांच्या घरी स्वतःचे खासगी शौचालयदेखील नव्हते. पण एके दिवशी त्यांच्या वडिलांना सबसिडी लॉटरीत घर मिळाले, तेव्हाच रिझवानला घर म्हणजे काय हे कळले?

वयाच्या १६ व्या वर्षी वडिलांचे निधन

रिझवान साजन १६ वर्षांचा असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. तीन भावंडांमध्ये सर्वांत मोठा असलेल्या रिझवान यांच्या खांद्यावर कुटुंबाचा भार पडला. रिझवान यांनी सुरुवातीला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शालेय पुस्तके विकली. नंतर दूध लाइन टाकण्याबरोबरच सणासुदीच्या वस्तू जसे की, दिवाळीला फटाकेही विकले.

कुवेतमध्येही मोठी आर्थिक कमाई

त्यानंतर रिझवान साजनने वडिलांच्या बचतीतून एक छोटासा मॉडेल बॉक्स फाइल बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. जरी त्यांचा व्यवसाय सुरुवातीला यशस्वी झाला असला तरी त्यांच्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी मिळणारे पैसे काही पुरत नव्हते. या संघर्षमय काळात रिझवान यांच्या काकांनी त्यांना कुवेतमध्ये नोकरी मिळवून दिली, तिथे ते बांधकाम साहित्याच्या दुकानात कामाला लागले. तिथे त्यांनी प्रशिक्षणार्थी सेल्समन म्हणून काम केले; ज्यानंतर त्यांचे नशीब चमकले. मेहनतीच्या जोरावर त्यांनी कुवेतमध्ये खूप पैसा कमावला. त्यानंतर एक आलिशान कार आणि फ्लॅट खरेदी केला. बहिणीचे लग्न केले. दरम्यान, त्यांच्या आयुष्यात पुन्हा चढ-उतार आले आणि १९९० मध्ये आखाती युद्धामुळे त्यांना मुंबईत यावे लागले.

हेही वाचा – पुणे महानगरपालिकेत १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या पगार, पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

रिदुबईमध्ये व्यवसायाची सुरुवात (Rizwan Sajan From Street Vendor to Billionaire)

त्यानंतर रिझवान साजन यांनी १९९३ मध्ये दुबईत आपला व्यवसाय सुरू केला, जिथे त्यांनी एक ट्रेडिंग फर्म स्थापन केली. त्यानंतर त्यांनी व्यवसायाची द्रुतगतीने वाटचाल सुरू केली. त्यानंतर २००८ साली त्यांनी डॅन्यूब ग्रुप या नावाने त्यांनी नवीन कंपनी स्थापन केली आणि त्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढला. या कंपनीच्या माध्यमातून बांधकाम साहित्याचा पुरवठा केला जातो; ज्यामध्ये सिमेंट, रेती, वाळू, स्टील व लाकूड यांचा समावेश आहे. रिझवान साजन यांनी २०१४ मध्ये रिअल इस्टेटमध्ये प्रवेश केला. इमारत बांधकामासाठी लागणारे साहित्य, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये रिझवान यांच्या ‘डॅन्यूब ग्रुप’चा समावेश आहे; जो दुबई, ओमान, कतार, बहरीन, सौदी अरेबिया व भारतात व्यवसाय करतो.

समूहाने २०१९ मध्ये १.३ अब्ज डॉलर्सची वार्षिक उलाढाल केली. डीएनए रिपोर्टनुसार, यूएईच्या अर्थ मंत्रालयाच्या वेबसाइटवर, रिझवान साजन यांची एकूण संपत्ती २.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजे अंदाजे २०,८३० कोटी रुपये आहे.