Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांच्या अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवार https://mazagondock.in/ या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३ एप्रिल २०२४ असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Mazagon Dock Bharti 2024: भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे आणि पदसंख्या, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण, अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

रिक्त पदे आणि पदसंख्या –

जनरल मॅनेजर – १, डेप्युटी जनरल मॅनेजर – १, सीनिअर इंजिनिअर – ४, डेप्युटी जनरल मॅनेजर -१, मॅनेजर- १, सीनिअर इंजिनिअर- ५ आदी १३ रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण – मुंबई.

वयोमर्यादा – ५४ वर्षे.

अर्ज फी – ३०० रुपये.

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होईल.

पगार –

जनरल मॅनेजर – १,२०,००० ते २,८०,००० रुपये.
डेप्युटी जनरल मॅनेजर – ९०,००० ते २,४०,००० रुपये.
सीनिअर इंजिनिअर – ४०,००० ते १,४०,००० रुपये.
डेप्युटी जनरल मॅनेजर – (E-6) – ९०,००० ते २,४०,००० रुपये.
मॅनेजर – ७०,००० ते २,००,००० रुपये.
सीनिअर इंजिनिअर (E-1) – ४०,००० ते १,४०,००० रुपये.

हेही वाचा…IITM Recruitment 2024 : पुण्यात नोकरीची संधी! ‘या’ रिक्त पदांवर भरती सुरू, आजच करा अर्ज

इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात…

लिंक – https://shorturl.at/jkqBJ

अशा प्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mazago mazagaon dock ship builders mumbai bharti for various vacant post till three april asp