Brihan Mumbai Mahanagarpalika Recruitment 2023: मुंबई महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे महापालिकने काही जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत पालिकेत कनिष्ठ लघुलेखक पदाची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.portal.mcgm.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिका भरती मंडळ, मुंबई द्वारे ऑगस्ट २०२३ च्या जाहिरातीनुसार ही भरती एकूण २२६ जागांसाठी असणार आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,पगार आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई भरती २०२३ –

पदाचे नाव – कनिष्ठ लघुलेखक (मराठी आणि इंग्रजी).

एकूण रिक्त पदे – २२६

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे तर मागासवर्गीय उमेदवारांचे वय ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

पगार – M15 (Pay Matrix ) २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपयांपर्यंत पगार मिळणार.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.

हेही वाचा- १२ वी पास आणि पदवीधरांना MIDC मध्ये नोकरीची मोठी संधी! ‘या’ ८०२ पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – १५ ऑगस्ट २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ सप्टेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

  • कनिष्ठ लघुलेखक(इंग्रजी) – १० वी पास आणि इंग्रजी टायपिंग ४० WPM आणि इंग्रजी स्टेनोग्राफी ८० WPM आणि MS-CIT.
  • कनिष्ठ लघुलेखक(मराठी) – १० वी पास आणि मराठी टायपिंग ३० WPM आणि मराठी स्टेनोग्राफी ८० WPM आणि MS-CIT.

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा.

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – १००० रुपये
  • मागास / इतर मागास प्रवर्ग – ९०० रुपये

भरती संबंधित सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा. (https://portal.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice/Junior%20Steno%20(E-C-M)%20Recruitment%20Advertisement-2023.pdf)

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mcgm bharti 2023 job opportunity for 10th pass candidates in mumbai municipal corporation recruitment for junior stenographer post has started jap