Mazagon Dock Recruitment 2023: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने शिकाऊ पदांसाठी जवळपास ४६६ रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. माझगाव डॉक भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
माझगाव डॉक भरती २०२३ –
एकूण रिक्त पदे – ४६६
पदाचे नाव –
ग्रुप A –
- ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, RAC, फिटर, पाईप फिटर, वेल्डर, स्ट्रक्चरल फिटर, COPA
ग्रुप B –
- फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर), कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, ICTSM
ग्रुप C –
- रिगर, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)
शैक्षणिक पात्रता –
- ग्रुप A – ५० टक्के गुणांसह १० वी पास.
- ग्रुप B – ५० टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
- ग्रुप C – ५० टक्के गुणांसह ८ वी पास.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्गाची वयोमर्यादा पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरील अधिकृत जाहिरात अवश्य पाहा.
ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षांची सूट, तर मागासवर्गीयांना ५ वर्षे सूट.
अर्ज शुल्क –
- खुला/ ओबीसी/ SEBC/ EWS – १०० रुपये.
- मागासवर्गीय/ PWD – फी नाही.
नोकरी ठिकाण – मुंबई.
हेही वाचा- नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत शिक्षक भरती सुरु, १० जुलैपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर
अधिकृत बेवसाईट – https://mazagondock.in/Index
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ५ जुलै २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२३
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1ishB8CyhobEbTg_Vwu6lMRN3TnXiGYGL/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.