नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! इ-कॉमर्स वेबसाइट मिशो, ऐन सणासुदीच्या काळात नोकरीची संधी देणार आहे. मिशो मर्यादित काळासाठी जवळपास पाच लांखापेक्षा जास्त नोकऱ्यांची संधी देणार आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विक्रेते आणि डिलिव्हरींग नेटवर्कच्या आवश्यक मदतीसाठी या नोकऱ्या निर्माण केल्या जाणार आहेत. मिशोने गेल्यावर्षी सणासुदीच्या निर्माण केलेल्या मर्यादित काळाच्या नोकऱ्यांच्या तुलनेत यंदा ५० टक्यांनी वाढ केली आहे.
‘इकॉम एक्सप्रेस’, ‘डीटीडीसी’, ‘इलास्टिक रन’, ‘लोडशेअर’, ‘डिलिव्हरी शॅडोफॅक्स’ आणि ‘एक्सप्रेसबीज’ सारख्या थर्ड-पार्टी लॉजिस्टिक्स (3PL) कंपन्यासह भागीदारी (Partnership)करून जवळपास २ लाख नोकऱ्यांची संधी देण्यास सक्षम होणे हे मिशोचे ध्येय आहे. यापैकी ६० टक्क्यांपेक्षा जास्त संधी टियर-III आणि टियर-IV क्षेत्रांमध्ये तयार होते.
“यामध्ये कामांमध्ये मुख्यत: डिलीव्हरी पिकिंग, सॉर्टिंगलोडिंग, अनलोडिंग आणि रिटर्न इन्स्पेक्शन यासारख्या कामांसाठी जबाबदार असतील. “आम्ही या सणासुदीच्या काळात मागणीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा करत आहोत.” या संधींची निर्मिती सणासुदीच्या काळात ग्राहकांना चांगला अनुभव देणे आणि असंख्य लहान व्यवसायांना सक्षम बनवणे यावर केंद्रित आहे. याव्यतिरिक्त, मिशो विक्रेत्यांसाठी सणासुदीच्या काळासाठी त्यांच्या गरजांचा भाग म्हणून ३ लाखांहून अधिक मर्यादीत काळासाठी कर्मचारी नियुक्त करतील असा अंदाज आहे.” असे मिशोच्या फुलफिलमेंट अँड एक्सपीरियन्सविभागाचे, चीप एक्सपीरियन्स अधिकारी असलेल्या सौरभ पांडे यांनी बिझनेस इंन्सायडरला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले.
हेही वाचा – ‘या’ उमेदवारांना पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी! AFMC अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर
सणासुदीच्या मर्यादित काळात वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन, पॅकेजिंग आणि वर्गीकरणासह विविध कामांमध्ये मिशो त्यांच्या विक्रेत्यांना मदत करणार आहे. तसेच मिशोच्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त विक्रेत्यांचा नवीन उत्पादन सादर करण्यासाठी आणि फ्रॅशन आणि अॅक्सेसरीज आणि उत्सव सजवाटीसारख्या नवीन श्रेणींमध्ये प्रवेश करण्याचा मानस आहे. वाढत्या मागणीसाठी ते स्वत:ला चांगल्यारितीने तयार आहेत याची खात्री करण्यासाठी, १० टक्क्यांहून अधिक मिशो विक्रेते साठवणूकीकरिता जास्त स्टोरेज स्पेस भाड्याने देण्यासाठी गुंतवणूक करत आहेत.
शॅडोफॅक्सचे सह-संस्थापक आणि सीईओ अभिषेक बन्सल म्हणाले, “ यंदा सणांच्या काळात टियर-III+ क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व विकासाची संधी पाहायला मिळतील. सर्वात कमी माहित असलेल्या बाजारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांमध्ये बदल दिसून आला आहे. गेल्या वर्षभरात, शॅडोफॅक्सने लखनऊ, सुरत, लुधियाना आणि सागर सारख्या शहरांमध्ये मोठ्या पिक-अप केंद्रांमध्ये गुंतवणूक केली आहे.”
मिशोचे थर्ड-पार्टी लॉजिस्टिक्स (3PL) इंकोसिस्टीममध्येदेखील प्रमुख्याने योगदान आहे ज्यांनी आर्थिक वर्ष २०२३ मध्ये थर्ड-पार्टी लॉजिस्टिक्स (3PL) दुप्पट करून रु. १.२ बिलियनपेक्षा जास्त व्यवसाय करण्याची महत्वाकांक्षा आहे.